नवी दिल्ली | आयपीएलच्या 13 व्या हंगामात गुरुवारी (15 ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात हैदराबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने अष्टपैलू ड्वेन ब्राव्होला शून्यावर बाद केल्यावर जोरदार आनंद साजरा केला. यावेळी तो ब्राव्होवर हसला या गैरसमजातुन त्याच्यावर सोशल मीडियावर बरीच टीका झाली होती. या टीकेनंतर खलीलने 15 ऑक्टोबरला ट्विटरवर आपले स्पष्टीकरण दिले आहे. मात्र नंतर त्यांने हे ट्विटही काढून टाकले.
खालीलच्या हास्यावर केली होती टीका
या सामन्यात चेन्नईच्या डावाच्या 20 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर खलील अहमदने चेन्नईचा अष्टपैलू फलंदाज ड्वेन ब्राव्होला बाद केले. ब्राव्होला बाद झाल्यावर खलीलने काही विशिष्ट पद्धतीने आनंद साजरा केला नाही, परंतु त्याच्या चेहऱ्यावर कुटिल हास्य दिसले होते. खलीलच्या या हास्यावर चाहत्यांनी टीका केली होती.
खालीलने दिले स्पष्टीकरण
सोशल मीडियावरील टीकेनंतर खलीलने स्पष्टीकरण देत एक ट्विट केले. त्याने लिहिले की, “मी ब्राव्होवर हसलो नाही, त्यामागे आणखी काही कारण होते, तो एक दिग्गज खेळाडू आहे, तो माझ्या मोठ्या भावासारखा आहे.” पण हे ट्विट नंतर खलीलने डिलिट केले.
चेन्नईने मिळवला विजय
चेन्नई सुपर किंग्सने हा सामना 20 धावांनी जिंकला होता. त्यामुळे चेन्नई अजूनही प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या स्पर्धेत कायम आहे. सलामीवीर शेन वॉटसन आणि अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू यांनी 81 धावांची भागीदारी केली. नाणेफेक जिंकल्यानंतर आणि फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर चेन्नईला सहा बाद 167 धावा करता आल्या. यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने सनरायझर्स हैदराबादला 147 धावांवर रोखले. हैदराबादकडून अनुभवी फलंदाज केन विल्यमसनने 39 चेंडूत 57 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चेन्नईला हलक्यात घेणार नाही’, चमकदार कामगिरी करणाऱ्या संघाच्या कोचचे वक्तव्य
रायडूवर टीका करणाऱ्या दिग्गजाने ठोकला आयपीएलला रामराम
सर्वच संघाना रोहितने सांगितला विजयाचा मार्ग, ‘ही’ गोष्ट केली तर विजय पक्का
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’
आयपीएल २०२०: कोलकाता संघाच्या ३ कमकुवत बाजू, ज्यावर त्यांनी द्यायला हवे लक्ष