---Advertisement---

खेलो इंडिया: जलतरणात महाराष्ट्राच्या करीना, शेरॉन, मिहिर सुवर्णपदकाचे मानकरी

---Advertisement---

पुणे। महाराष्ट्राच्या करीना शांक्ता, शेरॉन शाजू व मिहिर आंम्ब्रे यांनी सोनेरी वेध घेत जलतरणात चांगली कामगिरी केली. त्याखेरीज ज्योती पाटील व ऋतुजा तळेगावकर यांनी रौप्यपदक मिळविले. साध्वी धुरी हिने एक रौप्य व एक ब्राँझपदक पटकाविले.

मुलींच्या १७ वषार्खालील गटात करीना हिने १०० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनिट १६.८२ सेकंदात पूर्ण केली. तिने अलियाह सिंग (उत्तरप्रदेश) व रचना राव (कर्नाटक) यांच्यावर सहज मात केली.

मुलींच्या २१ वषार्खालील विभागात शेरॉन हिने १०० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनिट १६.८६ सेकंदात जिंकताना आपलीच सहकारी ज्योती पाटील हिच्यावर मात केली. ज्योती हिला हे अंतर पार करण्यास एक मिनिट १८.५४ सेकंद वेळ लागला. २०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत साध्वी धुरी हिने ब्राँझपदक मिळविताना हे अंतर दोन मिनिटे १९.३४ सेकंदात पार केले. तिने ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदकाची कमाई केली. तिला हे अंतर पार करण्यास ३०.८९ सेकंद वेळ लागला.

तामिळनाडूच्या ए.व्ही.जयावीणा हिने हे अंतर २९.१२ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. याच विभागात ऋतुजा तळेगावकर हिने ८०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. तिला हे अंतर पार करण्यास ९ मिनिटे ५८.५४ सेकंद वेळ लागला. तामिळनाडू्च्या भाविका दुगर हिने ही शर्यत ९ मिनिटे ४९.३९ सेकंदात जिंकली.

मुलांच्या २१ वषार्खालील विभागात मिहिर आंम्ब्रे याने ५० मीटर्स बटरफ्लाय शर्यत २५.७१ सेकंदात जिंकली. त्याने आतापर्यंत अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment