---Advertisement---

निवृत्तीविषयी गेलने टाकली गुगली; विंडीज बोर्डाकडे केली ‘ही’ मागणी

On: रविवार, नोव्हेंबर 7, 2021 7:46 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ च्या ३८ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा ८ गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ७ गडी गमावून १५७ धावा केल्या.
वेस्ट इंडिजने दिलेले १५८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने २ गडी गमावून सहज गाठले. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचे दोन दिग्गज ख्रिस गेल आणि ड्वेन ब्राव्हो निवृत्त झाले. वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा स्फोटक सलामीवीर ख्रिस गेल याची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. गेलने निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले. मला आता निवृत्त व्हायचे नाही, असे त्यांनी म्हटले आहे. त्याला जमैकामध्ये शेवटचा सामना खेळायचा आहे.

अनेक क्रिकेट चाहत्यांना असे वाटत होते की कदाचित टी२० विश्वचषकातील ख्रिस गेलचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असू शकतो परंतु त्याने अद्याप निवृत्ती घेण्यास नकार दिला आहे. मात्र, गेलने निवृत्तीचे वृत्त फेटाळून लावले आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर ख्रिस गेलने आयसीसीच्या फेसबुक लाईव्हमध्ये निवृत्तीबद्दल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “माझी कारकीर्द खूप छान झाली आहे. मी माझ्या निवृत्तीची घोषणा केलेली नाही पण बोर्डाने मला जमैकामध्ये निवृत्तीची संधी दिली तर, जेणेकरून मी माझ्या लोकांसमोर क्रिकेटला अलविदा म्हणू शकेन. बघूया काय होते ते. तसे झाले नाही तर मी याची घोषणा करेन आणि ब्राव्होसोबत यात सामील होईल.”

ख्रिस गेल हा टी२० चा महान खेळाडू मानला जातो. मात्र, या स्पर्धेत हा दिग्गज पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. गेलच्या खराब कामगिरीमुळे त्याच्या संघालाही फटका बसला. या विश्वचषकात गेलने आपल्या संघासाठी सर्व सामने खेळले आणि ५ सामन्यात त्याने केवळ ४५ धावा केल्या. गेलने गेल्या पाच वर्षांत आंतरराष्ट्रीय स्तरावर २७ डावांत केवळ एक अर्धशतक झळकावले आहे. टी२० विश्वचषकाच्या संघात त्याच्या निवडीवरही अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. याआधीही ख्रिस गेलने आयपीएलमध्ये खराब प्रदर्शन केले होते. त्यानंतर टी-२० विश्वचषकातही तो फ्लॉप ठरला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---