ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वनडे सामन्यांची मालिका अखेर समाप्त झाली आहे. सोमवारी (२६ जुलै) या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना पार पडला. हा सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ६ गडी राखून विजय मिळवला. यासह वनडे मालिका २-१ ने आपल्या नावावर केला. यापूर्वी झालेल्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलिया संघावर ४-१ ने विजय मिळवला होता. अशातच वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड याने असे काही कृत्य केले आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहे.
वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरोन पोलार्ड हा आपल्या तुफान फटकेबाजीसाठी ओळखला जातो. तसेच त्याने आपल्या मध्यमगती गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले आहे. परंतु या सामन्यात तो चक्क ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसून आला होता. इतकेच नव्हे तर जेव्हा ऑस्ट्रेलियन संघातील फलंदाज मॅथ्यु वेड नॉन स्ट्राइकला होता. तव्हा तो चेंडू टाकण्यापूर्वीच क्रिजच्या पुढे निघून गेला होता.
त्यावेळी ऑफ स्पिन गोलंदाजी करत असलेल्या पोलार्डने त्याला मांकडिंग करण्याची चेतावणी दिली होती. हे पाहून कसेबसे मॅथ्यु वेडने पटकन पाय क्रिजच्या आत नेत सुटकेचा श्वास सोडला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड शेअर केला जात आहे.(Kieron Pollard Bowled spin against australia gave mankading warning to Matthew wade)
https://twitter.com/Pacebouncy/status/1419808329409482761?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1419808329409482761%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.livehindustan.com%2Fcricket%2Fstory-wi-vs-aus-3rd-odi-match-kieron-pollard-bowled-spin-against-australia-gave-mankading-warning-to-matthew-wade-4264178.html
या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज एविन लुईसने नाबाद ५५ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. तसेच डॅरीन ब्रावोने १८ धावांचे योगदान दिले. याव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला साजेशी कामगिरी करता आली नाही. ऑस्ट्रेलिया संघाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ गडी बाद केले. वेस्ट इंडीज संघाचा डाव ४५.१ षटकात १५२ धावांवर संपुष्टात आला होता.
वेस्ट इंडिज संघाने दिलेल्या १५३ धावांचा पाठलाग करताना यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यु वेडने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. तर ॲलेक्स कॅरीने ३५ धावांचे योगदान दिले. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ६ गडी राखून आपल्या नावावर केला. तसेच ही आपली २-१ ने जिंकली.
महत्त्वाच्या बातम्या-
‘नेहमी मोठ्या भावाच्या चरणात’, म्हणत रणवीर सिंगने केला माहीसोबतचा फोटो शेअर; जिंकली लाखो मने
बोंबला! चक्क लाईव्ह सामन्यात घुसला चोर, क्रिकेटपटूंनी मॅच सोडून केला पाठलाग अन्…