शनिवारी (१ मे) झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे बलाढ्य संघ आमने सामने होते. या चुरशीच्या सामन्यात पॉईन्ट टेबल टॉपर चेन्नई सुपर किंग्ज संघाला मुंबईच्या पलटणने ४ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्डने महत्वाची भूमिका बजावली. त्याने गोलंदाजी करताना सलग २ गडी बाद केल्यानंतर आगळे वेगळे सेलिब्रेशन केल्याचे दिसून आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवून देण्यात कायरन पोलार्डने मोलाची भूमिका बजावली होती. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली होती. चेन्नई सुपर किंग्ज संघातील फलंदाज तुफान फटकेबाजी करत असताना १२ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या कायरन पोलार्डने षटकातील ५ व्या चेंडूवर फाफ डू प्लेसिसला माघारी धाडले होते. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर सुरेश रैनाला देखील तंबूत पाठवले होते.
यानंतर खाली वाकत हाताने आभार मानल्याप्रमाणे त्याने भन्नाट सेलिब्रेशन केले. याबरोबरच पुढे हाताचे बोट दाखवत जणू काही माझं नाव डोक्यात फिट करुन ठेवायचे, असे सर्वांना सांगत असल्याप्रमाणे कृती केली. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनने सोशल मीडियावर चाहत्यांची मन जिंकून घेतली.
https://www.instagram.com/p/COVdkoSlanL/?igshid=fy1380ecmzuj
Polly the savior 💙#MIvCSK #MI #pollard pic.twitter.com/bHvNpDGzCs
— Aravindh NL (@aravindh_nl) May 1, 2021
It's the 𝗕𝗜𝗚 𝗠𝗔𝗡's world and we are just living in it! 💙
Take a bow, Polly! 🙇♂️#OneFamily #MumbaiIndians #MI #MIvCSK #IPL2021 @KieronPollard55 pic.twitter.com/4NNJxsMbAM
— Mumbai Indians (@mipaltan) May 1, 2021
https://twitter.com/Itz_Sam10/status/1388557912809771012?s=20
पोलार्डच्या वादळी खेळीमुळे मुंबईने मिळवला विजय
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु ते स्वस्तात माघारी परतले होते. त्यानंतर कायरन पोलार्डने चेन्नईच्या गोलंदाजांची चांगली हजेरी घेतली. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ८७ धावांची खेळी करत सामना मुंबई इंडियन्स संघाला जिंकून दिला. विजय मिळवल्यानंतर देखील त्याने आक्रमक सेलिब्रेशन न करता आकाशाकडे पाहत देवाचे अभिवादन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
चेन्नईविरुद्ध ‘ती’ कृती करत क्विंटन डी कॉक पुन्हा झाला ट्रोल; चाहत्यांनी म्हटले, ‘जन्मजात चीटर!’
वन मॅन आर्मी! एकटा पॉलार्ड बलाढ्य सीएसकेला पडला भारी, ‘या’ विक्रमात रोहित-रैनालाही सोडले पिछाडीवर