संपूर्ण जग सध्या कोविड-१९ या जागतिक महामारीचा सामना करत आहे. या महामारीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याला क्रिकेटपटूही अपवाद नाहीत. वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज केराॅन पोलार्ड आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज फहिम अश्रफ यांना कोविड-१९मुळे मोठा फटका बसला आहे. Kieron Pollard And Faheem Ashrafs Northamptonshire Contracts Cancelled Overseas Deals
इंग्लंड काउंटी क्रिकेट क्लब नॉर्थम्पटनशायरने काल (२१ मे) पोलार्ड आणि अशरफ यांचा करार रद्द केला आहे. क्लबने त्यांना परदेशी खेळाडूंच्या रुपात संघात सामाविष्ट केले होते. मात्र, खेळाडू आणि व्यवस्थापकांच्या आपापसातील चर्चेनंतर क्लबने अखेर हा निर्णय घेतला आहे.
काही वृत्तांनुसार की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डबरोबरच काउंटी क्रिकेट संघानांही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झेलावे लागत आहे. नॉर्थम्पटनशायरचे मुख्य प्रशिक्षक डेव्हिड रिप्ले यांनी सांगितले की, “ही स्पष्टपणे निराशादायक बातमी आहे. कारण, ते शानदार खेळाडू आहेत. त्यांना संघात सामील केल्यापासून त्यांची चर्चा होत होती. मला खेळाडू आणि व्यवस्थापकांच्या समजदारी आणि सहयोगाबाबत त्यांना धन्यवाद द्यायचा आहे.”
काउंटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रे पेन यांनी सांगितले की, “भविष्यात परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर हे दोन्ही खेळाडू पुन्हा संघात सहभागी होऊ शकतात. आमच्याकडे पुढील हंगामाचे वेळापत्रक नाही. पण, एकदा आमच्या हातात वेळापत्रक आल्यास, आम्ही नक्की या खेळाडूंच्या पुनरागमनाविषयी चर्चा करु.”
कोरोना व्हायरसमुळे कांउटीच्या अनेक क्लबने त्यांचे परदेशी खेळाडूंशी असलेले करार रद्द केले आहेत. याचे मुख्य कारण हे की, आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे करारातील या रक्कमेतून क्लबची काही प्रमाणात मदत होऊ शकते.
“मात्र, क्लबने आयर्लंडचा फलंदाज पॉल स्टर्लिंगचा करार अद्याप तरी रद्द केलेला नाही. जर, काउंटीमधील ब्लास्ट गेम्सचे आयोजन झाल्यास स्टर्लिंगला खेळण्याची संधी मिळेल,” अशी क्लबने इएसक्रिकइंफोला माहिती दिली आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
हार्दिक पंड्या ‘या’ क्रमांकाची जर्सी घालून का खेळतो? ११ वर्षांनंतर उलगडले पंड्याचे गुपित
बापरे! ‘या’ क्रिकेटपटूच्या बहिणीचा अश्लिल भोजपुरी गाण्यावर…
त्याला कसोटीत न घेऊन टीम इंडियाच नुकसान झालं, त्याचं नाही