---Advertisement---

‘आता तुझे फॉलोव्हर्स वाढले असतील’, भारतीय दिग्गजाला पोलार्डने झापले, नंतर ट्वीटही केले डिलीट

On: गुरूवार, जून 2, 2022 7:37 PM
---Advertisement---

वेस्ट इंडिज संघाचा माजी कर्णधार कायरन पोलार्ड आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघासाठी गेली अनेक वर्षे चांगली कामगिरी करत आहे. अशात त्याच्याबाबत मोठी बातमी समोर येत आहे. त्याने भारताचा माजी सलामीवीर आणि क्रिकेट समालोटक आकाश चोप्राला फटकारले आहे. पोलार्डने या संदर्भात एक ट्वीट करत चोप्रावर निशाणा साधला होता. काही काळानंतर पोलार्डने हे ट्वीट डिलीट केले. मात्र, तोवर हे ट्वीट सर्वत्र व्हायरल झाले होते.

कायरन पोलार्डने (Kieron Pollard) आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “आशा आहे की, आता तुझा चाहतावर्ग आणि फॉलोअर्स वाढले आहेत. असेच करत राहा. #टी२०.” आकाश चोप्राने (Aakash Chopra) आयपीएल २०२२ मधील मुंबई इंडियन्सच्या रणनीती आणि खराब कामगिरीवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे पोलार्डने चोप्रावर निशाणा साधला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

Kieron-Pllard-Tweet
Photo Courtesy : Social Media

त्याच्या युट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला होता की, “मला वाटतं कायरन पोलार्डला आम्ही शेवटचं पाहिलंय. जर मुंबई संघाने त्याला रिटेन केले नाही, तर मुंबईला पुढील लिलावासाठी ६ कोटी रुपये मिळतील. याशिवाय मुरुगन अश्विन, जयदेव उनाडकट आणि टायमल मिल्स यांना देखील संघ बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.” याआधीही आयपीएल सुरू असताना अनेकदा आकाश चोप्राने कायरन पोलार्डच्या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, यंदाच्या हंगामात पोलार्डने मुंबई इंडियन्ससाठी ११ डावात १०७.४६च्या स्ट्राइक रेटने केवळ १४४ धावा केल्या आणि संपूर्ण हंगामात त्याला फक्त ४ विकेट घेतल्या आहेत. मधल्या फळीत मुंबई इंडियन्सला चांगला फिनिशर नसल्यामुळे त्यांना गुणतालिकेत तळाशी राहावे लागले. 

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

मोईन अलीसाठी आनंदाची बातमी! लवकरच होणार ‘ब्रिटिश’ पुरस्काराने सन्मान, संघातील पुनरागमनाच्या वाटाही मोकळ्या

मुंबईने नारळ दिलेला हार्दिक पंड्या असा झाला आयपीएल विजेता कर्णधार

मुंबईच्या खराब कामगिरीवर हळहळला पोलार्ड, भावूक पोस्ट लिहीत म्हणाला, ‘नुकसानीचा अंदाज लावणे कठीण’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---