शनिवारी (१ मे) क्रिकेट चाहत्यांना पैसावसूल सामना पाहण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या संघांमध्ये झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने बाजी मारत ४ गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्स संघाकडून कायरन पोलार्डने संघासाठी मोलाची भूमिका बजावली. तसेच सामना झाल्यानंतर मुलाखतीत त्याने शेवटच्या षटकाबद्दल खुलासा केला आहे.
या सामन्यापुर्वी मुंबई इंडियन्स संघाला गेल्या २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने गेल्या ४ सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून पोलार्डने एकहाती झुंज दिली होती. त्याने अवघ्या ३४ चेंडूत ८७ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला होता.
सामना झाल्यानंतर मुलाखतीत, पोलार्डने शेवटच्या षटकाबद्दल खुलासा करत म्हटले की, “गोलंदाजी करत असताना, आमचे गोलंदाज वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे चेन्नईच्या फलंदाजांना धावा करणे सोपे जात होते. त्यामुळे मी स्लोवर चेंडुंचा वापर केला होता. तसेच फलंदाजी करताना मला माहित होते माझ्याविरुद्ध वाइड यॉर्करचा वापर केला जाईल. परंतु यावेळी मी तयार होतो. मला त्याचा फायदाही झाला. मी भाग्यशाली आहे की, मला एकदा जीवनदान देखील मिळाले. शेवटच्या षटकात मी स्ट्राइक माझ्याजवळ ठेवली. कारण ६ पैकी ६ चेंडू मला खेळायचे होते. असं केलं तर आमची जिंकण्याची शक्यता वाढणार होती.”
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय चुकीचा ठरवत चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून अंबाती रायुडू याने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली होती.तर फाफ डू प्लेसिसने ५० आणि मोईन अलीने ५८ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्ज संघाने २० षटकअखेर ४ बाद २१८ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या,मुंबई इंडियन्स संघाकडून कायरन पोलार्डने अवघ्या ३४ चेंडूत ८७ धावांची खेळी करत ८७ धावा केल्या होत्या. या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघाने हा सामना ४ गडी राखून आपल्या नावावर केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहच्या गोलंदाजीला लागला सुरुंग, सीएसकेविरुद्ध केली आयपीएल कारकिर्दीतील सर्वात वाईट कामगिरी