---Advertisement---

‘शांत’ कृष्णाचा ‘तापट’ पोलार्डशी पंगा, भर मैदानातील खडाजंगीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

On: शुक्रवार, सप्टेंबर 24, 2021 10:48 AM
---Advertisement---

गुरुवारी (२३ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघामध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी पाहता या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु कोलकाता नाईट संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत मुंबई इंडियन्स संघाला ७ गडी राखून पराभूत केले. हा त्यांचा आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सलग दुसरा विजय आहे.

या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा उप कर्णधार कायरोन पोलार्ड आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांच्यात शाब्दिक युद्ध देखील रंगल्याचे पाहायला मिळाले होते. ज्यामुळे या सामन्यात गरमागरमी वाढली होती.

मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल स्पर्धेत ५ वेळेस जेतेपद पटकावले आहे. त्यामुळे प्रत्येक संघ मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असतो. यादरम्यान अनेकदा खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळत असते. असाच काहीसा प्रकार मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात देखील पाहायला मिळाला आहे.

वेस्ट इंडिज संघाचा विस्फोटक फलंदाज आणि मुंबई इंडियन्स संघाचा उप कर्णधार कायरोन पोलार्ड हा मैदानावर नेहमीच आक्रमक भूमिकेत असतो. तर दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा नेहमीच मैदानावर शांत असतो. तर झाले असे की, प्रसिद्ध कृष्णा १६ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी चौथ्या चेंडूवर कायरोन पोलार्डने हलक्या हाताने शॉट खेळला; तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने चेंडू उचलून पोलार्डकडे फेकून मारण्याचा इशारा केला. प्रसिद्ध कृष्णाला असे करताना पाहून पोलार्ड तिथून सरकला.

https://twitter.com/pant_fc/status/1441064613940850689?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1441064613940850689%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fmi-vs-kkr-prasidh-krishna-fight-with-kieron-pollard-watch-video-84234

हा प्रकार इथेच थांबला नाही तर, प्रसिध्द कृष्णा पुढे आला आणि कायरोन पोलार्डला घाबरवण्याचा प्रयत्न करताना दिसून आला. हे सर्व पाहून पोलार्डला खूप राग आला होता. तसेच षटक संपल्यानंतर दोघांमध्येही शाब्दिक चकमक देखील झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

डी कॉकचा ‘बुलेट’ चौकार थेट रोहितच्या डोक्यावरुन गेला अन् चाहत्यांच्या काळजात धस्स केलं, बघा तो प्रसंग

बोल्टच्या चेंडूवर व्यंकटेशचा ‘क्लासिक’ षटकार; डगआऊटमधून भज्जीही म्हणाला, ‘मान गये अय्यर’!

थरारक विजयानंतर केकेआरच्या संघनायकाला जबर धक्का, २४ लाखांचा झाला दंड; पुन्हा चूकल्यास…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---