वेस्ट इंडिजच्या स्फोटक फलंदाजांपैकी एक कायरन पोलार्ड याची पत्नी जेना हिलाही क्रिकेट या खेळाची प्रंचड आवड आहे. पतीला साथ देण्यासाठी बहुतेक वेळेस ती सामन्यात मैदानावर हजर असते. एवढेच नव्हे तर जेना स्पोर्ट्सशी संबंधित व्यवसायातील एक सुप्रसिद्ध नाव आहे.
10 एप्रिल रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे जेनाचा जन्म झाला. जेना आणि कायरन पोलार्डने जवळपास सात वर्षे एकमेकांना ‘डेट’ करत होते आणि त्यानंतर 2012 मध्ये त्यांचे लग्न झाले.
आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे कायरन पोलार्ड संपूर्ण जगाला परिचित आहे. परंतु केवळ काही लोकांनाच त्याच्या पत्नीच्या व्यवसायाबद्दल माहिती आहे.
जेना पेशाने व्यावसायिक आहे, जी तिच्या गावी स्पोर्ट्स अॅक्सेसरीजचा ब्रँड चालवते. या क्षेत्रात तिचे मोठे नाव आहे. केजे स्पोर्ट्स क्सेसरीज असे तिच्या ब्रँडचे नाव आहे. ती सोशल मीडियावर स्टारपेक्षा कमी नाही. तिच्या बोल्ड आणि सुंदर फोटोंमुळे बर्याचदा सोशल मीडियावर चर्चेत असते.
पोलार्डविषयी बोलायचे झाले तर, वेस्ट इंडिजचा हा शिलेदार आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा प्रमुख खेळाडू आहे. सिक्सर किंग पोलार्डने २०१० मध्ये मुंबई इंडियन्स संघातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यावेळी मुंबई इंडियन्सने त्याला ७.५ लाख डॉलर म्हणजे ३.३ कोटींना विकत घेतले होते. हा त्यावेळी आयपीएलच्या इतिहासात संयुक्त रुपाने करण्यात आलेला सर्वात महागडा करार होता.
पोलार्डच्या चॅम्पियन्स टी२० लीगमधील न्यू साउथ वेल्स संघाविरुद्धच्या फलंदाजी प्रदर्शनाने त्याला मुंबई इंडियन्सने इतक्या महाग किंमतीला विकत घेतले होते. त्याने त्रिनिदाद आणि टोबॅगो संघाकडून खेळताना १८ चेंडूत ५४ धावा केल्या होत्या. तेव्हापासून तो मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा फलंदाज आहे. पोलार्डने आयपीएलमध्ये आतापर्यंत १७१ सामने खेळत ३१९१ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी स्वत:च्या राष्ट्रीय संघाला नकार देणारा कायरन पोलार्ड
मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा सनसनाटी आरोप, म्हणाला “भारतीय खेळाडू बायोबबलमध्ये…”
हनुमा विहारीने टिकेला दिले सडेतोड उत्तर, ट्विट डिलीट करून पळाला ट्रोलर