जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याचा कालावधी मंगळवारी (३० नोव्हेंबर) संपुष्टात आला. आठ फ्रॅंचाईजींनी मिळून २७ खेळाडूला कायम ठेवले. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मासह चार खेळाडूंना कायम ठेवले. मात्र, यानंतर संघात सर्वात अनुभवी खेळाडू व उपकर्णधार कायरन पोलार्ड हा चर्चेत आला आहे.
मुंबईने केले चौघांना रिटेन
आयपीएलच्या पुढील हंगामासाठी मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्माला १६ कोटी, प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला १२ कोटी, मुंबईकर व संघाचा मुख्य फलंदाज सूर्यकुमार यादव याला ८ कोटी व संघातील सर्वात अनुभवी खेळाडू वेस्ट इंडीजचा अष्टपैलू कर्णधार कायरन पोलार्ड याला ६ कोटी रुपये देत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
MI's 𝐏𝐫𝐢𝐝𝐞 🔥
The 𝕃𝕃𝕆ℝ𝔻 was, is and will always be Mumbai’s heart! 😎💙#OneFamily #MumbaiIndians #IPLretention @KieronPollard55 pic.twitter.com/LOvF0CoPoQ
— Mumbai Indians (@mipaltan) November 30, 2021
सगळीकडे पोलार्डची चर्चा
या रिटेंशनमध्ये मुंबई इंडियन्सने आपला चौथा खेळाडू म्हणून कायरन पोलार्डचे नाव जाहीर करताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, चौथ्या रिटेन होणार्या खेळाडूला केवळ ६ कोटी रुपये मिळत आहेत. पोलार्डसारखा खेळाच्या तिन्ही प्रकारात योगदान देणारा व वेळप्रसंगी नेतृत्व करणारा खेळाडू आयपीएलच्या लिलावात उतरला असता तर त्याला ८ ते १० कोटींपर्यंत बोली लागू शकली असती.
राशिद खान व केएल राहुल यांच्यावर अधिक पैशासाठी संघासोबत न राहिल्याचा आरोप लावला जात आहे. मात्र, पोलार्डने स्वतःहून आपली किंमत कमी ठेवत १२ वर्षापासून मुंबई इंडियन्सशी असलेले आपले नाते अबाधित राखले. पोलार्ड २०१० पासून मुंबई इंडियन्सचा भाग आहे. संघाने मिळवलेल्या पाचही विजेतेपदात त्याचा सिंहाचा वाटा राहिला होता. पोलार्डने आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धानंतर आपल्याला मुंबईसाठीच खेळताना आयपीएलमधून निवृत्त व्हायला आवडेल असे म्हटले होते. त्याच्या या कृतीने मुंबई इंडियन्सचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे दोन गोलंदाज, नावं ऐकून व्हाल थक्क