‘लेट पण थेट‘ असे आपण अनेकदा वाचले किंवा ऐकले असेल. आता याचाच वापर कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी केला, तर वावगं ठरणार नाही. कारण, आयपीएल 2023 हंगामाची सुरुवात पराभवाने करणाऱ्या केकेआर संघाने दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरवर 81 धावांनी पहिला विजय मिळवा. या विजयामुळे उशिरा विजय मिळवणाऱ्या केकेआरने आयपीएल 2023 पॉइंट्स टेबलमध्ये थेट तिसऱ्या स्थानी झेप घेतली. हा सामना पाहण्यासाठी कोलकाताचा सहमालक शाहरुख खान हादेखील ईडन गार्डन्समध्ये उपस्थित होता. शाहरुख शेवटचा 2019मध्ये ईडन गार्डन्सवर आला होता. त्यावेळी कोलकाताने मुंबईविरुद्ध सामना खेळला होता.
या सामन्यानंतर शाहरुख खान (Shahrukh Khan) याने केकेआर आणि त्याच्या एका खास चाहत्याची भेट घेतली. हर्षल नावाचा हा विशेष चाहता ईडन गार्डन्सवर केकेआरच्या सामन्यासाठी नेहमी हजर असतो. शाहरुख खाननेही पुढे येऊन फक्त चाहत्याची भेटच घेतली नाही, तर त्याच्या कपाळाचे चुंबनही घेतले.
तो चाहता व्हीलचेअरवर होता आणि शाहरुखला ‘आय लव्ह यू’ म्हणत होता. शाहरुखने त्याला प्रेमाने उत्तर दिले आणि त्याला अभिवादन केले. हा चाहता 2018मध्येही कोलकाताचा सामना पाहण्यासाठी आला होता, तेव्हाही शाहरुखने त्याची भेट घेतली होती. कोलकाता नाईट रायडर्स संघाने या दोन्ही भेटींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Back home to Eden, back home to Harshul dearest 💜@iamsrk | #KKRvRCB | #AmiKKR | #TATAIPL 2023 pic.twitter.com/Y5cpp7RmFJ
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 6, 2023
सामन्याचा आढावा
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) आणि फिरकीपटूंनी मैफील लुटली. त्यांच्या जोरावर केकेआरने मजबूत फलंदाजी फळी असणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला 81 धावांनी पराभूत केले. शार्दुलने 29 चेंडूत तडाखेबंद 68 धावांची खेळी केली. त्याने यादरम्यान 3 षटकार आणि 9 चौकार मारले. याव्यतिरिक्त रहमानुल्लाह गुरबाज (Rahmanullah Gurbaz) यानेही 57 धावा करत अर्धशतक झळकावले. तो आयपीएलमध्ये अर्धशतक करणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू बनला. रिंकू सिंग यानेही 46 धावांची खेळी केली. या खेळीच्या मदतीने केकेआरने 7 विकेट्सच्या मोबदल्यात 204 धावा केल्या होत्या.
यानंतर केकेआरच्या फिरकीपटूंनी कमाल दाखवली. त्यांच्या मिस्ट्री स्पिनर्सच्या त्रिकुटाने 9 विकेट्स चटकावल्या. यावेळी वरुण चक्रवर्ती याने 4 विकेट्स, सुनील नारायण याने 2 विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, आपला पहिलाच आयपीएल सामना खेळत असलेल्या 19 वर्षीय सुयश शर्मा यानेही 3 विकेट्स नावावर केल्या. दिल्लीच्या या खेळाडूने यापूर्वी कोणताही प्रतिस्पर्धी सामना खेळला नव्हता. तसेच, त्याने कोणताही प्रथम श्रेणी किंवा अ दर्जाचा सामनाही खेळला नव्हता. या सामन्यात केकेआरचे आव्हान पार करताना बेंगलोर संघाला फक्त 17.4 षटकात 10 विकेट्स गमावत 123 धावाच करता आल्या. त्यामुळे हा सामना केकेआरने 81 धावांनी नावावर केला. (king shahrukh khan meets kkrs die hard special fan at eden gardens see video)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विजयानंतर KKRची गरुडझेप! पॉइंट्स टेबलमध्ये RCBला जबर धक्का, तिसऱ्या स्थानावरून थेट ‘या’ स्थानी घसरण
रेकॉर्ड अलर्ट! धोनीचा विक्रम मोडत सॅमसन बनला राजस्थानचा सर्वात यशस्वी फलंदाज, वाढवले बीसीसीआयचे टेन्शन