---Advertisement---

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

On: गुरूवार, एप्रिल 22, 2021 3:38 PM
---Advertisement---

आयपीएल लीगमध्ये पाच वेळा विजेतेपद जिंकलेल्या मुंबई इंडियन्स संघाची 2021 च्या आयपीएल हंगामातील कामगिरी समाधानकारक राहिली आहे. या हंगामात मुंबईने चार पैकी दोन सामन्यांत विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. परंतु सध्या या संघासाठी एक आनंददायक बातमी आली आहे. त्यांच्या संघातील 58 वर्षीय यष्टीरक्षक सल्लागार किरण मोरे हे कोरोनाच्या विळख्यातून सुटले असून लवकरच संघाच्या ताफ्यात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई इंडियन्सने ट्विट करत याबद्दल माहिती देताना म्हटले आहे की, ‘किरण मोरे हे कोरोनाच्या संसर्गातून बरे झाले असून क्वारंटाईन कालावधीही पूर्ण केला आहे. तसेच आरटी-पीसीआरच्या तीन चाचण्यांतही निगेटीव्ह आढळले आहेत. त्यामुळे आमच्या संघाच्या वैद्यकीय पथकाने बीसीसीआयशी सल्लामसलत करून ते मुंबई इंडियन्सच्या बायो बबलमध्ये सामील होण्यासाठी तंदुरुस्त असल्याचे निश्चित केले आहे.’

कोराना विषाणूमुळे आयपीएलचे मागील 2020 सत्र युएई मध्ये आयोजित करणात आले होते. परंतु यंदा मात्र ते भारतात घेण्यात आले आहे. परंतु कोरोना विषाणूचा हाहाकार अजून चालूच असल्याने चाहत्यांना सामना पाहण्यासाठी स्टेडीयम वरती येण्यास मनाई आहे. आणि खेळाडूंना बायो बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. तरी सुद्धा आयपीएल सुरू होण्यापुर्वी काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती त्यामध्ये आरसीबीचा देवदत्त पडीकल, दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल यांनाही कोरानाची लागण झाली होती. तसेच एनरिख नॉर्खिया याचाही रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता परंतु तो चुकीचा रिपोर्ट असल्याचे सांगितले आहे. तर अक्षर पटेल अजूनही यातून सावरलेला नाही असे सांगितले जात आहे.

मुंबई इंडियन्स यंदाच्या मोसमातील पहिल्या सामन्यात आरसीबी विरूद्ध पराभव झाल्यानंतर पुढील दोन सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद विरूद्ध विजय नोंदवला पण दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात पुन्हा त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले. सध्या मुंबई इंडियन्समधील फलंदाजांची मधली फळी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत असल्याने मुंबई इंडियन्स पुढे चिंता निर्माण झाली असून त्यांचा अगामी सामना 23 एप्रिल रोजी पंजाब किंग्ज विरूद्ध होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---