---Advertisement---

विराट कोहलीने 5 वर्षांसाठी भाड्याने घेतला किशोर कुमार यांचा बंगला; बनवतोय रेस्टॉरंट!

On: गुरूवार, सप्टेंबर 1, 2022 9:10 PM
---Advertisement---

हिंदी चित्रपटातील दिग्गज गायक किशोर कुमार (Kishore Kumar) यांनी गायलेल्या गाणी नेहमीच अनेकांच्या मनावर राज्य करत आहेत. 1946 ते 1987 हा काळ त्यांनी त्यांच्या आवाजाने गाजवला आहे. आजही लोक त्यांची गाणी गुणगुणतात. यामुळेच त्यांच्या चाहत्यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता याच यादीत भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीचा देखील समावेश झाला आहे. अशी बातमी आहे की, भारतीय संघाचा क्रिकेटपटू विराट कोहली याने किशोरदांचा बंगला भाड्याने घेतला आहे. यामागील नेमके काय कारण असेल हे आपण जाणून घेऊया.

विराट उभारत आहे रेस्टॉरंट 
माध्यमांतील वृत्तानुसार, विराट कोहली (Virat Kohli) याने किशोर कुमार (Kishore Kumar) यांचा जुहू येथील बंगल्याचा एक मोठा भाग भाड्याने घेतला आहे. विशेष म्हणजे, विराट या बंगल्याचा कायापालट करत तिथे हाय ग्रेट रेस्टॉरंट उभे करणार आहे. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, किशोर कुमार यांच्या जुहू येथील बंगल्यात मोठा बदल केला जात आहे. तसेच, येथील रेस्टॉरंट हे जवळपास तयार झाले आहे. सध्यातरी विराटकडून याबाबत कोणतेही विधान पुढे आले नाही. तर तो मैदानाबाहेर एक नवा डाव खेळण्यास तयार आहे, हे आपण म्हणू शकतो

अमित कुमार यांनी केले स्पष्ट
या वृत्ताची स्पष्टता किशोर कुमार यांचा मुलगा आणि गायक अमित कुमार (Amit Kumar) याने या वृत्ताला दुरोजा दिला आहे. अमित यांनी सांगितले की, विराट कोहली याची भेट लीना चंदावरकर यांचा मुलगा सुमीत याच्याशी झाल्यानंतर, या गोष्टीला सुरुवात झाली होती. काही महिन्यांपूर्वी त्यांची भेट झाली होती आणि त्यांच्यात चर्चा झाली होती. ते म्हणाले, “आम्ही विराटला 5 वर्षांसाठी ती जागा भाड्याने दिली आहे.”

https://www.instagram.com/p/Bt20BetAhjM/?utm_source=ig_web_copy_link

विराटचे तिसरे रेस्टॉरंट
विराट कोहलीचे हे पहिले रेस्टॉरंट नाहीये. त्याने याची सुरुवात त्याने 2017मध्ये दिल्लीतील आरके पुरम येथून केली होती. पहिले रेस्टॉरंट दिल्लीत सुरू झाले, त्यानंतर दिल्लीतच त्याने दुसरे रेस्टॉरंट सुरू केले आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘विराट-सूर्यापेक्षा बाबर चांगला…’ म्हणणाऱ्या पत्रकाराला टीम इंडियाच्या चाहत्यांनी केले ट्रोल
टीम इंडियाची खिलाडूवृत्ती! हॉंगकॉंगच्या संघाला केले ड्रेसिंग रूममध्ये आमंत्रित; पाहा खास छायाचित्रे
केएल राहुलला अजून संधी दिल्याच पाहिजे! भारताच्या माजी कर्णधाराची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---