---Advertisement---

आरसीबीला सर्वाधिकवेळा बाद करणाऱ्या संघांच्या यादीत केकेआऱ दुसऱ्या क्रमांकावर, ‘हा’ संघ आहे अव्वल स्थानावर

On: मंगळवार, सप्टेंबर 21, 2021 7:03 AM
---Advertisement---

युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील ३१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही बलाढ्य संघ आमने-सामने होते. या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला ओएन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने चांगलाच दणका दिला आहे. गोलंदाजांनी केलेल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ६० चेंडू आणि ९ गडी राखून आपल्या नावावर केला आहे. यासह एका मोठ्या विक्रमाला देखील गवसणी घातली आहे.

रॉयल चॅलेंजर्स संघाला सर्वाधिक वेळेस पराभूत करणाऱ्या संघांच्या यादीत कोलकाता नाईट रायडर्स संघाने दुसरे स्थान पटकावले आहे. यासह त्यांनी पंजाब किंग्सची बरोबरी केली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाने आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला १५ वेळेस पराभूत केले आहे. पंजाबनेही बेंगलोरला १५ वेळा पराभूत केले आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संयुक्तरित्या आहेत. या दोन्ही संघांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला प्रत्येकी १७ वेळेस पराभूत केले आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात ७ सामने खेळले होते. ज्यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले होते. त्यामुळे असा अंदाज व्यक्त केला गेला होता की,दुसऱ्या टप्प्यात देखील तो जोरदार कामगिरी करतील. परंतु पहिल्याच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला सर्वाधिक वेळेस पराभूत करणारे संघ 
१७ वेळेस – चेन्नई सुपर किंग्स
१७ वेळेस – मुंबई इंडियन्स
१५ वेळेस – कोलकाता नाईट रायडर्स*
१५ वेळेस – पंजाब किंग्स

या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ६० चेंडू आणि ९ गडी शिल्लक असतानाच आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मिस्टर ३६०’ आला आणि गेला! रसलने टाकलेल्या वेगवान चेंडूने डिविलियर्सच्या केल्या दांड्या गुड, पाहा व्हिडिओ

बंगळूरूला चारीमुंड्या चीत करत कोलकाताने नोंदवला आयपीएलच्या इतिहासातील मोठा ‘सांघिक रेकाॅर्ड’

‘आयपीएलमध्ये कोणाकडे तीक्ष्ण मेंदू असेल तर तो एमएस धोनीकडे आहे’, सेहवागने उधळली स्तुतीसूमने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---