कोलकाता नाईट रायडर्सनं यंदा तिसऱ्यांदा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. केकेआरनं आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. यासह कोलकात्याचा 10 वर्षांचा विजेतेपदाचा दुष्काळ संपला आहे. या संघानं शेवटची आयपीएल ट्रॉफी 2014 मध्ये जिंकली होती.
विजेतेपद पटकवल्यानंतर आता केकेआरचे खेळाडू एक एक करून आपापल्या घरी परतत आहेत. संघाचा युवा वेगवान गोलंदाज वैभव अरोरा देखील हरियाणातील अंबाला येथे त्याच्या गावी परतला, जिथे त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. वैभव हा अशा युवा खेळाडूंपैकी एक आहे, ज्यानं आयपीएलच्या या हंगामात खूप प्रभावित केलं आहे. वैभवने महत्त्वाच्या वेळी केकेआरला विकेट्स मिळवून दिल्या. त्याचं हे पहिलंच आयपीएल विजेतेपद आहे. हा युवा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज या हंगामात कोलकाता संघाचा महत्त्वाचा भाग राहिला.
वैभव जेव्हा त्याच्या घरी परतला, तेव्हा त्याच्या स्वागतासाठी अनेक लोक उभे होते. लोकांनी त्याला पुष्पहार घालून जल्लोष केला. त्याच्या स्वागताचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक त्याच्या नावाच्या घोषणा देतात दिसत आहेत. यासोबतच चाहते त्याच्यासोबत सेल्फीही घेत आहेत. वैभवच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर जमलं होतं. यावेळी त्याची शहरभर मिरवणूक काढण्यात आली आणि ठिकठिकाणी लोकांची त्याचं जोरदार स्वागत केलं.
Vaibhav Arora received a hero’s welcome as he returns to his hometown after KKR’s IPL win. 💜 pic.twitter.com/dkMkttLQWi
— Harsh (@NotSoH4rsh) May 31, 2024
या हंगामात कोलकाताच्या विजयात वैभवचा वाटा महत्त्वाचा राहिला. त्यानं खेळलेल्या 10 सामन्यांत 11 विकेट घेतल्या. या काळात त्याची सरासरी 25.09 होती आणि इकॉनॉमी 8.24 एवढी होती. त्यानं पॉवरप्लेमध्ये मिचेल स्टार्कला चांगली साथ दिली. वैभव अरोरानं दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकांत 27 धावांत 3 बळी घेतले. यामध्ये रिषभ पंतच्या विकेटचाही समावेश होता. नवीन चेंडू स्विंग करण्याची वैभवची क्षमता अद्भूत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“असा विचार कधीच केला नव्हता…”, अमेरिकेत खेळल्या जात असलेल्या विश्वचषकाबाबत काय बोलला विराट कोहली?
वडिलांच्या निधनानंतर घेतला क्रिकेटमधून ब्रेक! टी20 विश्वचषकापूर्वी स्टार खेळाडूचा मोठा निर्णय