कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आयपीएल २०२१ ला मे महिन्यात स्थगिती देण्यात आली होती. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, भारतीय क्रिकेट बोर्डाने उर्वरित आयपीएलचे सामने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये खेळविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र इतर देशातील खेळाडूंचा आयपीएल खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होता. अशात कोलकाता नाईट रायडर्ससाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गन आयपीएलचे उर्वरित सामने खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
इंग्लंडचा संघ सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. ज्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार होते. त्यामुळे इंग्लिश खेळाडूंच्या आयपीएल खेळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बांगलादेशचा हा दौरा स्थगित केला आहे. ज्यामुळे आता इंग्लंडच्या खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, मॉर्गनने तो आयपीएल खेळणार असल्याचे सांगितले.
क्रिकइन्फोनुसार, इंग्लंडमध्ये चालू असलेल्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेतील एका सामन्यानंतर मॉर्गनने याबाबत स्पष्टीकरण दिले. त्याचबरोबर इंग्लंडचे बाकीचे खेळाडू उर्वरित आयपीएल खेळणार की नाही याबाबत बोलताना तो म्हणाला, “आयपीएल खेळायचे की नाही हा प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक निर्णय आहे”.
पुढे तो म्हणाला, “माझ्या मते बांगलादेश सोबत मालिका खेळणे किंवा आयपीएल खेळणे या दोन्ही बाबी खेळाडूंसाठी महत्त्वाच्या आहेत. जर आम्ही बांगलादेश दौर्यावर गेलो असतो, तर आम्हाला तेथील परिस्थितीनुसार खेळावे लागले असते. त्याचबरोबर आयपीएल खेळण्यासाठी यूएईला गेलो तर आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने खेळावे लागेल. बांगलादेश दौरा रद्द झाल्यानंतर खेळाडूंना आराम करायचा असेल, तर तो पूर्णपणे त्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल,” असेही मॉर्गन म्हणाला.
बीसीसीआयने काहीदिवसांपूर्वीच उर्वरित आयपीएल २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार १९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने खेळवण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –