कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांनी सांगितले की, आयपीएल 2025 साठी श्रेयस अय्यर हा रिटेन खेळाडूंच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र, अखेरच्या क्षणी त्याचा पत्ता कट झाला आणि तो सहाही रिटेन खेळाडूंमध्ये समाविष्ट नाही झाला. गुरुवारी नाइट रायडर्सने रिंकू सिंग (13 रुपये), सुनील नरुन (12 कोटी, आंद्रे रसेल (12 कोटी), वरुण चक्रवर्ती (12 कोटी), हर्षित राणा (4 कोटी) आणि रमणदीप सिंग (4 कोटी) यांना आगामी हंगामासाठी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
गेल्या वर्षी नाइट रायडर्सने विजेतेपद पटकावल्यानंतरही श्रेयसचे नाव या यादीत आले नाही. त्याच्या नेतृत्वाखाली, संघाने ट्रॉफी उचलताना 10 वर्षांची प्रतीक्षा संपवली. श्रेयस रिटेन खेळाडूंमध्ये का नव्हता याबाबत बोलताना मैसूर म्हणाले, “त्याचे बरेच पैलू आहेत आणि ते खेळत आहेत. लोकांना टिकवून ठेवण्यासाठीची मूलभूत गोष्ट म्हणजे बहुतेक लोकांना कधीकधी हे समजत नाही की, ही परस्पर सहमतीची बाब आहे. फ्रॅंचाईजी एकटीच निर्णय घेत नाही. खेळाडूला देखील विविध घटकांचा विचार करावा लागतो आणि सहमती दर्शवावी लागते.”
ते पुढे म्हणाले, “पैसा आणि कोणीतरी त्यांचे मूल्य आणि जे काही आहे ते तपासू इच्छित आहे. निर्णयांवर त्याचा परिणाम होतो. मात्र, तो आमच्या यादीत नंबर 1 होता. त्याच्यासोबत सर्वांचेच संबंध उत्कृष्ट होते. अनेकदा लोक त्यांच्यासाठी सर्वोत्तम काय आहे, याचा निर्णय घेतात आणि पुढे वाटचाल करतात.” मैसूर यांनी त्याच्या संघाच्या वाटचालीतील योगदानाची प्रशंसा केली. तसेच कर्णधार म्हणून त्याच्या योगदानाचे कौतुक देखील केले.
श्रेयस हा 2022 मध्ये संघाचा भाग बनला होता. त्यानंतर त्याच्याकडे नेतृत्व देण्यात आले. आयपीएल 2023 मध्ये तो दुखापतीमुळे सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र, यावर्षी त्याने पुनरागमन करत संघाला विजेतेपद मिळवून दिले.
हेही वाचा –
रिटेंशनमध्ये कोहलीच्या आवडत्या सिराजवर का भारी पडला यश दयाल? जाणून घ्या आतली कहाणी
“कोणीतरी लवकरच पिवळी जर्सी घालेल”, सीएसकेच्या माजी खेळाडूने पंतबाबत दिले मोठे संकेत
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!