ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस ग्रीनला या आयपीएल हंगामात (2020) कोलकता नाईट रायडर्सने आपल्या संघात सामील करून घेतले. पंरतू त्याला बिग बॅश लीग (BBL) मध्ये संशयास्पद गोलंदाजी शैली मुळे तीन महिन्यासाठी निंलबीत करण्यात आले.
ख्रिस ग्रीनचा आता आयपीएलमधील सहभाग लीगच्या संचालन परिषदेच्या मान्यतेवर अवलंबून असेल, कारण त्याची बंदी 29 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेतही कायम राहील.
गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात केकेआरने 26 वर्षीय ऑफ स्पिनर ग्रीनला 20 लाखांच्या मुळ किंमतीत विकत घेतले होते.
त्याच्या संशयास्पद गोलंदाजी शैलीचा अहवाल मागच्या आठवडयात सिडनी थंडरच्या मेलबर्न स्टार्स विरूद्ध झालेल्या सामन्यादरम्यान देण्यात आला.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे संचालक प्रमुख पीटर रोच यांनी cricket.com.aune सांगितले की आम्ही या प्रक्रियेत पूर्ण सहकार्याबद्दल ख्रिस आणि सिडनी थंडरची प्रशंसा करू इच्छितो. ख्रिसच्या गोलंदाजी शैलीची चाचणी झाली आणि येत्या काही महिन्यांत निलंबनाची वेळ संपल्यानंतर आम्ही त्याची पुन्हा चाचणी करू.
ती एक चूक शुबमन गिलला पडली महागात बीसीसीआयने सुनावली ही मोठी शिक्षा
वाचा????https://t.co/yfPbVvEyGH????#म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020
या मैदानात होणार आयपीएल २०२०चा पहिला सामना..
वाचा????https://t.co/6lKhqohW8M????#म #मराठी #Cricket #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) January 9, 2020






