बुधवारी (26 मार्च) आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा सामना खेळला गेला. बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात केकेआर ला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या संधीचे सोने करत केकेआरच्या दोन्ही सलामीवीरांनी संघाला मोठी सलामी दिली. हंगामातील आपला दुसरा सामना खेळत असलेल्या जेसन रॉय याने सलग दुसऱ्या सामन्यात वेगवान अर्धशतक झळकावले.
ICYMI!
6️⃣6️⃣6️⃣.6️⃣
When Jason Roy went berserk in the powerplay 🔥🔥
WATCH 🎥🔽 #TATAIPL | #RCBvKKR https://t.co/V0GjgY8HuQ
— IndianPremierLeague (@IPL) April 26, 2023
केकेआरचा कर्णधार नितिश राणा याने नाणेफेक गमावल्याने केकेआरला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले गेले. अनुभवी जेसन रॉय व युवा एन जगदीशन यांनी ही संधी साधली. दोघांनी 9.2 षटकात 83 धावांची सलामी दिली. हंगामातील दुसरा चांगला खेळत असलेल्या रॉयने पुन्हा एकदा आक्रमक फलंदाजीचा नमुना सादर केला.
त्याने अवघ्या 22 चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने चार चौकार व पाच षटकारांच्या मदतीने 29 चेंडूवर 56 धावांची आणखी एक जबरदस्त खेळी केली. त्याने शाहबाज अहमद याच्या एकाच षटकात तब्बल चार षटकार लगावले. विशेष म्हणजे त्यातील तीन षटकार सलग मारले होते. त्याला विजयकुमार वैशाक याने तंबूचा रस्ता दाखवला.
रॉयला आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केले नव्हते. मात्र, शाकिब अल हसन याने हंगामातून माघार घेतल्याने त्याच्या जागी रॉयला संधी दिली गेली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या मागील सामन्यातही तो असाच चमकला होता. त्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने 25 चेंडूवर 61 धावांची तुफानी खेळी केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी देखील त्याने मोईन अलीच्या एका षटकात सलग तीन षटकार ठोकलेले.
(KKR Opener Jason Roy Again Hits Blitz Fifty Against RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! रिंकूकडून 5 षटकार खाणारा गुजरातचा खेळाडू आजारी, 8 किलो वजनही उतरलं; पंड्याचा मोठा खुलासा
आयपीएलच्या पहिल्या 35 सामन्यात हे सहा धुरंधर चमकले, यादीत फक्त दोन भारतीय