---Advertisement---

अतिशय निराशादायी, माफी असावी; केकेआरच्या दारुण पराभवानंतर संघ मालकाने व्यक्त केली दिलगिरी

---Advertisement---

यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नईच्या मैदानावर मंगळवारी (13 एप्रिल) मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मुंबई संघावर वर्चस्व गाजवले होते. तरीही ते विजय मिळवण्यात अपयशी ठरले. 153 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाता संघाला अखेर 30 चेंडूंत फक्त 31 धावांची गरज होती आणि त्यांचे सहा गडीही अजून खेळायचे बाकी होते. परंतु त्यानंतर त्यांच्या संघातील गडी पटापट बाद झाल्याने त्यांना 10 धावांनी पराभवाची चव चाखावी लागली.

या लज्जास्पद पराभवामुळे सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरू झाली असून बॉलिवूड अभिनेता आणि संघाचा मालक शाहरुख खान याने ट्विट करुन माफी मागितली आहे.

या सामन्यात केकेआरने प्रथम गोलंदाजी करताना आंद्रे रसेलच्या दोन षटकांमध्ये 15 धावात 5 बळी घेण्याच्या विक्रमी गोलंदाजीवर मुंबई इंडियन्सला 152 धावांवर रोखण्यात यश मिळवले होते. तसेच लक्ष्याचा पाठलाग करतानाही त्यांच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली होती. यामध्ये नितीश राणाने 57 आणि शुभमन गिलने 33 धावांची खेळी साकारली होती. परंतु हे दोघे बाद झाल्यावर कोणत्याही फलंदाजाला नीट दुहेरी आकडासुद्धा गाठता आला नाही. त्यामुळे केकेआर संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 142 धावा करू शकला.

यामुळे हातात आलेला सामना गमावल्याचे दुःख संघाचा मालक शाहरुखला देखील झाले. त्याने चाहत्यांना ट्विटरद्वारे मागीतलेली माफी या गोष्टीचे साक्षीदार आहे. ज्यामध्ये त्याने चाहत्यांकडे या पराभवाबद्दल दिलगिरी व्यक्त केल असून आपल्या खेळाडूंच्या कामगिरीबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, “अतिशय निराशाजनक कामगिरी. थोडक्यात सांगायचे म्हटले तर, मला कोलकाता नाईट रायडर्सच्या सर्व चाहत्यांची दिलगिरी व्यक्त करायला आवडेल.”

तसेच शाहरुखशिवाय या सामन्यात शेवटचे दोन चेंडू खेळण्याकरीता खेळपट्टीवर हजर असलेल्या संघाच्या 40 वर्षीय फिरकी गोलंदाज हरभजन सिंगनेही ट्विटद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्याने ‘Gutted’ हा एकच शब्द लिहिला, ज्याचा अर्थ निराशाजनक असा होतो.

यंदाच्या आयपीएल मोसमातील कोलकाता नाईट रायडर्सच्या पहिल्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला होता. परंतु यावेळी मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय नोंदवण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना पुढच्या सामन्यात चांगली कामगिरी करून शाहरुखला उत्साहाने काहीतरी खास ट्विट करण्याची संधी देऊ शकतील, अशी अपेक्षा आहे. कोलकाताचा पुढील सामना १८ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

गमावता सामना जिंकण आम्हाला जमतं! मुंबई इंडियन्सने कसा केला सामन्याचा कायापालट? ऐका रोहितच्या तोंडून

अरेरे! पहिला चेंडू टाकण्याआधीच रोहितचा पाय मुरगळला अन् वेदनेने मैदानावर व्हिवळत बसला, पाहा व्हिडिओ

हाताचे बोट तुटलेले असूनही केकेआरच्या गोलंदाजाने रोहित-इशानला धाडलं तंबूत, जाणून घ्या कसा झालता अपघात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---