---Advertisement---

हाताचे बोट तुटलेले असूनही केकेआरच्या गोलंदाजाने रोहित-इशानला धाडलं तंबूत, जाणून घ्या कसा झालता अपघात

On: बुधवार, एप्रिल 14, 2021 8:18 AM
---Advertisement---

मंगळवारी (13 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात चेन्नई येथे झालेला पाचवा सामना अतिशय रोमांचक ठरला. या अटीतटीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर 10 धावांनी विजय मिळवला. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने रोहित शर्मा (43 धावा) आणि इशान किशन (01 धावा) यांच्या महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.

आयपीएल लीगच्या 2020 च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) 15.50 कोटी रक्कम मोजून ऑस्ट्रेलियाचा जगातील अव्वल वेगवान गोलंदाजांपैकी एक असणाऱ्या पॅट कमिन्सला आपल्या ताफ्यात सामील केले होते. कमिन्स हा कसोटी क्रिकेटमधील जगातील पहिल्या क्रमांकाचा वेगवान गोलंदाज आहे. तसेच तो मर्यादित षटकांच्या सामन्यात देखील उत्कृष्ट गोलंदाजी करतो.

मात्र जेव्हा जेव्हा तो गोलंदाजीकरीता मैदानात उतरतो तेव्हा लोकांच्या नजरा त्याच्या मधल्या बोटाकडे जातात. कारण त्याचे मधले बोट फारच लहान असून त्यामागचे कारण बर्‍याच लोकांना माहितही नाही.

2011 मध्ये क्रिकेट.कॉम.एयूला दिलेल्या मुलाखतीत त्याने तो लहान असताना त्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग कसा गमावला? हे सांगितले. तो म्हणाला, “जवळ जवळ मी तीन किंवा चार वर्षाचा असेन. तेव्हा एका दरवाजाच्या फटीत अडकून माझ्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा एक सेंटीमीटरचा भाग तुटला होता.”

परंतु मधले बोट तुटले असतानासुद्धा तो चमकदार गोलंदाजी करतो. जगभरातील मोठ-मोठे दिग्गज फलंदाज त्याच्या गोलंदाजीचा सामना करण्यास कचरतात. त्याच्या या छोट्या बोटाचा त्याच्या गोलंदाजीवर परिणाम काय होतो का? असे विचारले असता त्याने, “खरोखर याचा मला काही परिणाम होत नाही. कारण दुसरी बोटे देखील त्याच्याइतकी उंच आहेत.” असे सांगितले होते.

असे असले तरी, त्याचा मागील आयपीएल हंगाम काही खास गेला नव्हता. मागील हंगामात तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरला होता. परंतु त्याची कामगिरी त्याच्या नावासारखी मोठी झाली नव्हती. मागील आयपीएल पर्वात त्याने 14 सामने खेळताना फक्त 12 बळी घेतले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

रोहितचे अर्धशतक हुकले पण केला ‘हा’ मोठा कारनामा; आता केवळ विराट आणि रैना आहेत पुढे

मुंबई इंडियन्सने केलेल्या ‘त्या’ ट्विटने जिंकले मराठी चाहत्यांचे मन; पाहा असं काय लिहिलं होतं 

दे घुमा के! सुर्यकुमारचा ९९ मीटरला हेलिकॉप्टर षटकार पाहून हार्दिक पंड्याही झाला थक्क, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---