सोमवारी (१८ एप्रिल) मुंबंईच्या ब्रेबॉर्न्स स्टेडियमवर चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ७ धावा राखून कोलकाता नाइट रायडर्सला धूळ चारली. २१८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेला केकेआर संघ २१० धावांवर गुंडाळला गेला. फलंदाजी करताना केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर त्याचा सहकाही अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यरवर चिडल्याचे पाहायला मिळाले.
केकेआरच्या फलंदाजीवेळी १६ व्या षटकात वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट गोलंदाजीसाठी आला. स्ट्राईकवर असलेल्या वेंकटेशने बोल्टच्या षटकातील शेवटचा चेंडू डीप बॅकवर्ड पॉईंटवर खेळला. या चेंडूवर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात दिसला. श्रेयस दुसरी धाव घेण्यासाठी खेळपट्टीच्या अर्ध्यात धावत देखील आला होता, पण वेंकटेशने त्याला माघारी पाठवले. क्षेत्ररक्षक शिमरोन हेटमायरने मात्र तोपर्यंत चेंडू पकडून यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात फेकला होता. सुदैवाने श्रेयसला विकेट गमवावी लागली नाही.
वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) द्वारे दुसरी धाव घेतली गेली नसल्यामुळे श्रेयस अय्यर संतापला होता आणि यादरम्यान त्याची विकेट देखील जाऊ शकत होती. या प्रसंगी श्रेयस जेव्हा स्ट्राईकवर पोहोचला, तेव्हा वेंकटेशवर मोठ्याने ओरडल्याचे पाहायला मिळाले. तर नॉन स्ट्राईकवरील वेंकटेश गप्प उभा राहून कर्णधाराचे बोलणे खात होता. श्रेयसला या चेंडूवर जरी जीवनदान मिळाले असले, तरी पुढच्याच षटकात फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलने त्याला तंबूत धाडले. जीवनदानानंतर श्रेयसला एकही धाव घेता आली नाही.
https://twitter.com/addicric/status/1516111965600378884?s=20&t=QO0YIYaTLTED3-fgSmHxVw
श्रेयसने लखनऊविरुद्धच्या या सामन्यात स्वतःच्या संघासाठी सर्वाधिक म्हणजेच ८५ धावा केल्या. यासाठी त्याने ५१ चेंडू खेळले आणि यामध्ये ७ चौकारांसह ४ षटकार देखील मारले. तसेच केकेआरचा सलामीवीर एरॉन फिंचने २८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या.
असे असले तरी, प्रथम फलंदाजी करताना राजस्थानसाठी सलामीवीर जोस बटलरने दिलेले योगदान खरोखर सर्वोत्कृष्ट होते. त्याने ६१ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह १०३ धावा केल्या. तसेच गोलंदाजी करताना युजवेंद्र चहलने डावाच्या १७ व्या षटकात तब्बल ५ विकेट्स घेतल्या आणि हॅट्रिक देखील पूर्ण केली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
हर्षल पटेल व्हर्जन २.०! आरसीबीच्या गोलंदाजाचा नवा अवतार, सरावादरम्यान मारला ‘नो लूक सिक्स’
केकेआरच्या खेळाडूला जोराने डोक्यावर लागला चेंडू, पाहून चहलच्या हृदयाची वाढली धडधड; केली विचारपूस