---Advertisement---

कोलकाताचा हुकमी गोलंदाज सुनिल नरेनवर येणार बंदी? वाचा काय आहे कारण

---Advertisement---

कोलकाता नाईट रायडर्सचा फिरकीपटू सुनिल नरेन याच्या गोलंदाजी शैलीमुळे (ऍक्शन) तक्रार करण्यात आली आहे. ही तक्रार इंडियन प्रीमियर लीग २०२०च्या २४व्या सामन्यादरम्यान मैदानावर उपस्थित असणाऱ्या पंचांनी केली आहे. अबु धाबी येथे शनिवारी (१० ऑक्टोबर) किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध हा सामना झाला होता. या सामन्यात नरेनने २८ धावा देत २ विकेट्स चटकावल्या होत्या.

बीसीसीआयनुसार, आयपीएलच्या बेकायदेशीर गोलंदाजी ऍक्शन पॉलिसी अंतर्गत नरेनचे नाव चेतावणी यादीमध्ये सामील करण्यात येईल. मात्र त्याला आयपीएलमध्ये गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाईल. शेवटी बीसीसीआयच्या संशयित गोलंदाजी ऍक्शन समितीचा अहवाल आल्यानंतर त्याच्या गोलंदाजीवरील निलंबनाचा निर्णय होईल.

महत्त्वाचे म्हणजे, नरेनच्या गोलंदाजी ऍक्शनवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिली वेळ नाही. यापुर्वीही २०१५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि २०१८ साली पाकिस्तान प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजीवरुन त्याच्यावर आरोप लावण्यात आले होते.

पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात कोलकाता संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पंजाब संघ २० षटकात ५ विकेट्स गमावत १६२ धावाच करु शकला. त्यामुळे केवळ २ धावांनी पंजाबने तो सामना गमावला.

महत्त्वाच्या बातम्या-

RCB च्या भेदक माऱ्यापुढे CSK गपगार, बेंगलोरचा ३७ धावांनी विजय; चेन्नईचा पुढचा प्रवास खडतर

तुम तो छा गये भैया! युवराजच्या बॅटने आतापर्यंत २२० धावा कुटणारा ‘तो’ बनणार केकेआरचा कॅप्टन?

धोनीच्या मुलीला बलात्काराची धमकी देण्याऱ्या पोस्टवर भडकला पठाण; दिली तीव्र प्रतिक्रिया

ट्रेंडिंग लेख-

आयपीएल २०२० : ‘या’ तीन संघांचे प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित

आयपीएलमध्ये ‘या’ ४ खेळाडूंना कोणत्याही क्षणी संघ देऊ शकतात नारळ

फलंदाजीत लईच भारी! ‘या’ ३ संघांचा आयपीएल २०२०मध्ये नादच खुळा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---