आयपीएल 2025 पूर्वी फ्रँचायझींमध्ये बदलारे वारे वाहू लागले आहे. आयपीएल लिलावापूर्वी कोणाला रिलीज केले जाणार आणि कोणाला संघात कायम ठेवले जाणार?, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) मधून अनेकजण बाहेर पडत आहेत. गौतम गंभीर, अभिषेक नायर आणि रायन टेन डेशॉटे सारखे प्रशिक्षक केकेआरपासून वेगळे झाले आहेत. हे सर्व दिग्गज भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहेत. यादरम्यान आणखी एका खास व्यक्तीने केकेआरचा निरोप घेतला आहे. केकेआर संघाचे विश्लेषक एआर श्रीकांत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
एआर श्रीकांतबद्दल बोलायचे झाले तर, ते गेल्या 17 वर्षांपासून संघाशी जोडले गेले होते. कुलदीप यादव, रिंकू सिंग आणि सुनील नारायण सारख्या खेळाडूंना करारबद्ध करण्याचे बरेच श्रेय एआर श्रीकांत यांना जाते. केकेआरने आतापर्यंत तीनदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे आणि या काळात श्रीकांत यांनी व्हिडिओ विश्लेषक म्हणूनही खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मात्र, आता श्रीकांत यांनी केकेआरपासून फारकत घेतली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून ही माहिती दिली.
श्रीकांत म्हणाले, केकेआर सोबतचा माझा 17 वर्षांचा अविस्मरणीय प्रवास मी संपवत आहे. याक्षणी मी संघ मालक, वेंकी सर, व्यवस्थापन, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, खेळाडू आणि स्काउट्स यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांच्यासोबत काम करणे खूप छान अनुभव होता. संघाच्या यशात योगदान दिल्याबद्दल आणि फ्रँचायझीची प्रगती पाहिल्याबद्दल मला खूप अभिमान आहे. तुमच्या पाठिंब्याबद्दल, सहकार्याबद्दल आणि महत्त्वाच्या धड्यांसाठी खूप खूप धन्यवाद. हा अनुभव मी माझ्यासोबत पुढे नेईन. फ्रँचायझीने भविष्यात आणखी चांगली कामगिरी करावी अशी माझी इच्छा आहे.
View this post on Instagram
श्रीकांत आयपीएलच्या सुरुवातीपासून संघ विश्लेषक म्हणून काम करत होते. मात्र, आता त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवीन हंगामापूर्वी केकेआरला नवे प्रशिक्षक तसेच संघ विश्लेषकांना करारबद्ध करावे लागणार आहे.
हेही वाचा-
वेड्या बहिणीची वेडी ही माया! खास पोस्ट शेअर करत साराच्या अर्जुनला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा
अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त वडील सचिन तेंडुलकरची मन जिंकणारी पोस्ट; म्हणाला, “माझ्या गुणी…”
‘मन’ खूप झालं आता ‘जग’ जिंकायचंय! टी20 विश्वचषकापूर्वी कर्णधार हरमनप्रीतची ऑस्ट्रेलियाला चेतावणी