आयपीएल 2020 चा (IPL 2020) 13वा हंगाम (13th Season) जवळ येत आहे. आयपीएलसाठी सर्व फ्रँचायझी संघ सज्ज झाले आहेत. परंतु आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) या फ्रँचायझीला मोठा धक्का बसला आहे.
कोलकाताने यावर्षीच्या आयपीएल लिलावात खरेदी केलेला अनुभवी फिरकीपटू प्रवीण तांबे (Pravin Tambe) आयपीएल 2020 खेळण्यासाठी अपात्र ठरला आहे. कारण तो अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा न करता परदेशी लीगमध्ये खेळला असल्याने बीसीसीआयच्या (BCCI) नियमांचे उल्लंघन झाले आहे.
2018 मध्ये तांबेने अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा न करता दुबई आणि शारजातील टी10 लीगमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडू किंवा बीसीसीआयशी सलंग्न असलेले खेळाडू फक्त आयपीएलमध्ये खेळतील त्यांना परदेशी लीग स्पर्धा खेळण्याची परवानगी नाही. जर भारतीय खेळाडूंना परदेशी लीग स्पर्धांमध्ये खेळायचे असल्यास त्यांनी आयपीएल तसेच बीसीसीआयच्या सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्तीची घोषणा केलेली असावी किंवा बीसीसीआयची परवानगी घेतलेली असावी.
48 वर्षीय तांबेला डिसेंबर 2019मध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या 13 व्या मोसमाच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने(केकेआर) 20 लाखांच्या मुळ किंमतीत संघात सामील करुन घेतले होते.
आयपीएलचे नवे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी तांबे आयपीएल 2020 खेळण्यास अपात्र असल्याच्या वृत्तास संमती दिली आहे. त्यानुसार कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझीला माहितीही देण्यात आली आहे.
तांबेने याआधी आयपीएलमध्ये एकूण 33 सामने खेळले असून त्यात त्याने 30.46 च्या सरासरीने 28 विकेट्स घेतल्या आहेत.
धक्कादायक! केन विलियम्सनच्या जागी 'हा' खेळाडू करणार आयपीएलमध्ये हैद्राबादचे नेतृत्व
वाचा- ????https://t.co/EayjCP3wxR????#म #मराठी #Cricket #IPL2020 @SunRisers— Maha Sports (@Maha_Sports) February 27, 2020
रोलर चालविणारा धोनी कधी पाहिलाय का? पहा…
वाचा- ????https://t.co/aHcY1prdXJ????#म #मराठी #Cricket #TeamIndia @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) February 27, 2020