आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीग म्हणून ओळखली जाते. जगभरातील युवा प्रतिभावान खेळाडूंसाठी हा एक उत्तम मंच आहे. याच प्रतिभावान खेळाडूंपैकी एक असलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यंदा किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत आहे. अद्यापही त्याने त्याच्या नावाला साजेशी कामगिरी केलेली नाही. मात्र, सोमवारी (26 ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाज नितीश राणाला बाद केले. त्याच्या या विकेटची चांगलीच चर्चा होत आहे.
या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने वेगवान गोलंदाजांऐवजी फिरकी गोलंदाजांसह गोलंदाजीला सुरुवात केली. फिरकीपटू ग्लेन मॅक्सवेलने पहिले षटक फेकले. त्याच्या षटकातील दुसराच चेंडू त्याने लेग साईड कडे फेकला. सलामीवीर नितीशने मॅक्सवेलच्या लेग साइडकडे जाणाऱ्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू सरळ क्षेत्ररक्षक ख्रिस गेलच्या हाती गेला आणि नितीश राणा झेलबाद झाला. या झेलचा व्हिडीओ आयपीएलच्या संकेतस्थळावररून शेअर करण्यात आला आहे.
या सामन्यात नितीश राणाला डावाच्या सुरुवातीला बाद करणे फारच अवघड होते कारण त्याने मागील सामन्यातच 81 धावांचा मोठा डाव खेळत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.
ग्लेन मॅक्सवेलच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आयपीएल 2020 मध्ये आतापर्यंत शंभराहून अधिक चेंडूंचा सामना केला आहे. त्याचे दुर्दैव असे की, त्याला एकदाही षटकार मारता आला नाही. याखेरीज त्याने स्पर्धेच्या 11 सामन्यांत 102 धावा केल्या असून फलंदाजीने सर्वांनाच निराश केले आहे. पण नितीश राणाची विकेट घेऊन त्याच्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ झाली असेल.
या सामन्यात विजय मिळवून पंजाब संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. पंजाबचा पुढील सामना 30 ऑक्टोबरला राजस्थानशी होणार आहे. राजस्तानविरुद्ध विजय मिळवून प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा अधिक भक्कम करण्याचा पंजाबचा प्रयत्न असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरु; प्रशिक्षक रवि शास्त्रींसमवेत दोन दिग्गज खेळाडू यूएईला रवाना
वडिलांच्या निधनाचे दुःख पचवत त्याने केली दमदार खेळी, म्हणाला “बाबा नेहमीच मला…”
हिट-मॅन IPLमधून आऊट झाल्यास मुंबईला गंभीर तोटे; इतका महत्वाचा ठरतोय संघासाठी रोहित
ट्रेंडिंग लेख –
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल