आयपीएलचा दोन वेळचा चॅम्पियन संघ कोलकाता नाईट रायडर्सचा आज (दि. 14) घरच्या मैदानावर अर्थात ईडन गार्डनवर लखनऊ सुपर जायंट्स संघासोबत सामना होणार आहे. लखनऊ संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. लक्ष्य गाठणे असो की लक्ष्य राखणे दोन्ही बाबतीत लखनऊ सध्या यशस्वी होत आहे. दुसरीकडे केकेआर अर्थात कोलकाता संघ मात्र खुप लयीत असल्याचे दिसत नाही. तरीही हे दोन्ही संघ आकडेवारीत तुल्यबळ असल्याचे दिसतंय.
केकेआर आणि लखनऊ यांच्यात दुपारी 3.30 वाजल्यापासून सुरुवात होईल. दोन्ही संघांनी यंदा प्रत्येकी तीन-तीन विजय नोंदवले आहेत. ईडन गार्डनवर लखनऊचा हा पहिला सामना असून प्ले ऑफसाठी दोन्ही संघाकरिता आजच्या सामन्यातील विजय महत्वाचा ठरू शकतो. ( KKR vs LSG IPL 2024 record for Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants overall stats )
कोलकाता संघासाठी हे खेळाडू ठरू शकतात तारणहार –
आंद्रे रसेल, सुनील नारायण या कॅरिबियन जोडीवर केकेआर संघ अतिशय अलवंबून आहे. त्यांच्या कामगिरीवर आज सर्वांची नजर असेल. दुसरीकडे कर्णधार श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांच्याकडूनही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तसेच रमनदीपसिंग, अंगक्रिश रघुवंशी यांच्याकडूनही पुन्हा चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. तर मिचेल स्टार्क गोलंदाजीत कमाल करतो का हे पाहावे लागेल.
लखनऊ संघाची मदार या दमदार खेळाडूंवर –
क्विंटन डिकॉक, कर्णधार लोकेश राहुल हे सध्या लखनऊचे तारणहार असल्याचे दिसतंय. त्यांच्याकडून आज मोठ्या खेळीची सर्वांनाच अपेक्षा आहे. तर मार्कस् स्टोयनिस आणि निकोलस पूरन हेही लौकिकानुसार खेळी करतील, असे अपेक्षित आहे. आयुष बदोनी, अर्शद खान हे युवा सध्या चमकत आहेत. तर गोलंदाजीची भिस्त ही रवी बिश्नोई आणि कृणाल पंड्या या फिरकीवर असू शकते.
अधिक वाचा –
– अंगावर काटे आणणाऱ्या सामन्यात राजस्थानचा पंजाबवर 3 गडी राखून विजय
– चेन्नईचे ‘हे’ 5 खेळाडू मुंबईला करू शकतात चारीमुंड्या चीत, शेवटचे नाव अत्यंत महत्वाचे । MI Vs CSK IPL 2024
– काय सांगता, रोहित शर्मा बनला चक्क बस ड्रायव्हर! सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल