---Advertisement---

केएल राहुल असा कारनामा करणारा भारताचा पहिलाच विकेटकीपर

On: मंगळवार, फेब्रुवारी 11, 2020 2:16 PM
---Advertisement---

माऊंट मॉनगनुई। आज(11 फेब्रुवारी) भारताचा न्यूझीलंड विरुद्ध वनडे मालिकेतील तिसरा सामना बे ओव्हल स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 296 धावा केल्या आहेत आणि न्यूझीलंडला विजयासाठी 297 धावांचे आव्हान दिले आहे.

भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने शतकी खेळी केली आहे. त्यामुळे तो न्यूझीलंडमध्ये वनडे शतक करणारा पहिलाच भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

राहुलच्याआधी न्यूझीलंजमध्ये भारताच्या 8 यष्टीरक्षक फलंदाजांनी वनडे सामने खळले आहेत. पण यातील एकालाही शतक करता आले नाही.

राहुलने आज न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात 113 चेंडूत 112 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.

त्याच्या व्यतिरिक्त श्रेयस अय्यरने 62 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर मनिष पांडेने 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ 40 धावांची खेळी करुन धावबाद झाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---