---Advertisement---

आरसीबीविरुद्ध केएल राहुलने केली तुफान फटकेबाजी, मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम

On: शुक्रवार, सप्टेंबर 25, 2020 2:50 PM
---Advertisement---

काल (24 सप्टेंबर) रोजी आयपीएलच्या 13 व्या हंगामातील सहावा सामना किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघादरम्यान खेळला गेला. या सामन्यात पंजाबच्या संघाने 97 धावांनी विजय मिळविला. या सामन्यात पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सर्वोत्कृष्ट फलंदाजी केली.

त्याने 69 चेंडूत 132 धावा केल्या. त्यामुळे तो आयपीएलमध्ये वेगवान 2000 धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने मुंबई इंडियन्स संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

त्याने आयपीएलच्या 60 व्या डावात फलंदाजी करताना 2000 धावा पूर्ण केल्या, तर सचिन तेंडुलकर 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 63 डाव खेळले होते. टी20 चा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने अवघ्या 48 डावात ही कामगिरी केली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा फलंदाज शॉन मार्शने अवघ्या 52 डावात 2 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

केएल राहुलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलच्या सुरुवातीला त्याची कामगिरी तेवढी चांगली नव्हती. त्याने पहिल्या 27 सामन्यात फक्त 358 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर त्याची बॅट चांगलीच तळपली. त्याने पुढच्या 42 सामन्यात 1642 धावा ठोकल्या. त्याने आता 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. पहिल्या 1000 धावा पूर्ण करण्यासाठी तो 38 डाव खेळला होता. त्यानंतरच्या 1000 धावा त्याने फक्त 22 डावात पूर्ण केल्या. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे राहुलची सरासरी 41 पेक्षा जास्त आहें आणि आयपीएलमध्ये वेगवान 2000 धावा काढणाऱ्या फलंदाजांमध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आयपीएलच्या मागील हंगामात केएल राहुलने 53 च्या सरासरीने 593 धावा केल्या होत्या. ज्यात एक शतक आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. 2018 मध्ये त्याने 54 च्या सरासरीने 659 धावा केल्या होत्या तर 2016 मध्ये त्याने 14 सामन्यांत 44.11 च्या सरासरीने 397 धावा केल्या होत्या. राहुल सातत्याने चांगली कामगिरी करीत असून या हंगामात उत्तम कामगिरी करेल अशी आशा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---