अबू धाबी | किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार केएल राहुल इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या हंगामात त्याला सातत्याने मोठे डाव खेळण्यात यश आले आहे. यादरम्यान त्याने एका विक्रमला गवसणी घातली आहे. आयपीएलच्या 50 व्या सामन्यात त्याने अनोखा विक्रम केला आहे. हा विक्रम करत त्याने आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
या सामन्यात राहुलने केल्या 46 धावा
अबुधाबी येथे शुक्रवारी (30 ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात आयपीएल मधील 50 वा सामना झाला. या महत्वपूर्ण सामन्यात राहुलने 41 चेंडूत 46 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार लगावले आणि आक्रमक फलंदाज ख्रिस गेलबरोबर 120 धावांची भागीदारीही केली.
हंगामात केल्या 600 धावा
या सामन्याआधी केएल राहुलने या हंगामात 595 धावा केल्या होत्या. या सामन्यात 6 धावा करताच त्याने या हंगामात 600 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने आयपीएल कारकिर्दीत दुसऱ्यांदा 600 धावा केल्या आहेत. याआधी 2018 मध्ये त्याने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना हंगामात 659 धावा केल्या होत्या. आयपीएल कारकिर्दीत दोन हंगामात 600 धावा करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
याआधी विराट कोहलीने केली आहे ही कामगिरी
याआधी आयपीएलमध्ये 2016 आणि 2019 च्या हंगामात विराटने 600 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. 2016 मध्ये कोहलीने 973 धावा केल्या होत्या, तर 2013 मध्ये 634 धावा केल्या होत्या.
यष्टीरक्षक फलंदाज म्हणून पूर्ण केल्या 2000 धावा
या सामन्यादरम्यान राहुलने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये 2000 धावाही पूर्ण केल्या आहेत.
Another milestone 🔓#Dream11IPL pic.twitter.com/AWUMBV8YzZ
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
राहूलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
राहुलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 36 कसोटी सामने खेळले आहेत.त्यात त्याने 2006 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर 32 वनडे सामन्यात त्याने 1239 धावा केल्या आहेत आणि 41 टी20 सामन्यांमध्ये 1461 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
राग भोवला! ख्रिस गेलला ‘त्या’ कृत्यामुळे सुनावण्यात आली शिक्षा
करमणुकीचा बाप! विरूकडून गेलला कौतुकाची थाप; दिली नवी उपाधी
हा फलंदाज टिकला तर विजय पक्का! स्टीव्ह स्मिथने ‘या’ खेळाडूचे केले तोंडभरून कौतुक
ट्रेंडिंग लेख –
सीके नायडूंनी ८८ वर्षांपूर्वी मारला होता ‘तो’ ऐतिहासिक षटकार
…आणि १५ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ खेळीने एमएस धोनी भारतीय चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाला