---Advertisement---

BREAKING: अखेर राहुल झाला आण्णाचा जावई! आथियाशी बांधली लग्नगाठ

On: सोमवार, जानेवारी 23, 2023 6:57 PM
KL Rahul Athiya Shetty
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी लग्नबंधनात अडकले आहेत. सोमवारी (23) त्यांचे लग्न सुनील शेट्टी याच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडला. सुनील शेट्टी याची मुलगी अथिया आणि राहुल यांच्या लग्नाच्या चर्चा मागच्या काही महिन्यांपासून सुरू होत्या. अखेर सोमवारी दोघांची लग्नगाठ बांधली गेली. सुनील शेट्टीकडून दोघांच्या लग्नाची माहिती मिळाली.

केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) यांच्या लग्नाचे फोटो किंवा व्हिडिओ अद्याप बाहेर आला नाहीये. पण लग्न पार पडल्यानंतर अथियाचे वडील सुनील शेट्टी (Sunil Shetty) स्वतः फार्म हाऊसच्या बाहेर पत्रकारांना मिठाई वाटण्यासाठी आला होता. यावेळी सुनील शेट्टीने तो अधिकृतपणे आता सासरा झाल्याचे सांगितले. यावेळी सुनील शेट्टीने असेही सांगितले की, राहुल आणि अथियाला जास्त मोठे लग्न नको होते. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होते.

https://www.instagram.com/reel/Cnwfj6th_TX/?utm_source=ig_web_copy_link

 

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल लग्नानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेसाठी उपस्थित असेल. ऑस्ट्रेलियन संघ फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात येणार आहे. भारतीय संघ सध्या खेळत असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत 2-0 अशा विजयी आघाडीवर आहे. राहुलने लग्नासाठी बीसीसीआयकडने सुट्टी मागितल्यामुळे त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 संघातून विश्रांती दिली गेली. न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका मंगळवारी (24 जानेवारी) संपणार आहे. उभय संघातील तीन सामन्यांची टी-20 मालिका शुक्रवारी (27 जानेवारी) सुरू होईल. (KL Rahul and Athiya Shetty got married)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टेन्शन नको, विराट तिसरा वनडे गाजवणारच! भारतीय दिग्गजाने व्यक्त केला ठाम विश्वास
पोरी एक पाऊल पुढे! 2022 आयसीसी टी20 संघात स्मृतीसह तब्बल चार भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---