भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल टी-20 विश्वचषक संपल्यानंतर विश्रांतीवर आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल या तीन प्रमुख फलंदाजांना न्यूझीलंड दौऱ्यात विश्रांती दिली गेली. अशात केएल राहुलविषयी महत्वाची माहिती समोर येत आहे. राहुल पुढच्या महिन्यात त्याची प्रेयसी अथिया शेट्टी सोबत लग्नबंधनात पडू शकतो. याच पार्श्वभूमीवर त्याला बीसीसीआये सुट्टी दिल्याचे समोर येत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार केएल राहुल (KL Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार आहेत. याच कारणास्तव राहुलने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली आहे आणि त्याला ही सुट्टी मंजूर देखील झाल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाहीये. असे असले तरी, राहुल भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्यात मात्र संघासोबत असेल.
बॉलिवुडचा दिग्गज अभिनेता आणि अथियाचा वडील सुनील शेट्टी याने काही दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाविषयी पुष्टी केली होती. अशात आता बीसीसीआयच्या विश्वसनीय सुत्रांकडून या लग्नाविषयी महत्वाची माहिती मिळाली आहे. वृत्तांनुसार राहुले वैयक्तिक कारणास्तव जानेवारी महिन्यात सुट्टी मागितली आहे. बीसीसीआय अधिकाऱ्याच्या हवाल्याने अशी माहिती दिली गेली आहे की, “मला माहीत नाही की, ते लग्न करणार आहेत की साखरपुडा. पण त्याचे काहीतरी वैयक्तिक कारण आहे, ज्यामुळे तो सुट्टी घेत आहे. मी एवढेच सांगू शकतो.”
दरम्यान, भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या या मालिका मायदेशात खेळायच्या आहेत. मात्र, अद्याप या मालिकेचे वेळापत्रक निश्चित झाले नाहीये. पण उभय संघांतील ही मालिका जानेवारी 2023 च्या सुरुवातीलाच आयोजित केल्या जाईल, असे सांगितले जात आहे. तत्पूर्वी संघापुढे बांगलादेश दौऱ्यात चांगले करण्याचे आव्हान असेल. बांगलादेविरुद्ध भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका 4 डिसेंबर रोजी सुरू होईल, तर कसोटी मालिका 14 डिसेंबर रोजी सुरू होईल. (KL Rahul asked BCCI for leave for marriage! Will marry Athiya on ‘this’ day.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | हॅरी ब्रुकची कसोटीत टी-20 सारखी खेळी, एका षटकार मारले सहा चौकार
मित्र असावा तर असा ! कैफला युवराजकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा; म्हणाला, ‘माझ्या कुशीत परत…’