भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल कर्णधार विराट कोहलीने दिलेली कोणतीही जबाबदारी चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. आता तो गरीब मुलांच्या मदतीसाठी समोर आला आहे. त्याने आपला ब्रँड ‘गली’बरोबर ही मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
राहुलने (KL Rahul) २०१९च्या विश्वचषकात ज्या बॅटचा वापर केला होता. त्या बॅटबरोबरच तो आपल्या इतर क्रिकेटच्या वस्तूंचादेखील लिलाव करणार आहे. तसेच त्यामधून जे काही रुपये येतील ते सर्व तो अवेअर फाऊंडेशनला देणार आहे.
राहुलने १८ एप्रिलला आपला २८वा वाढदिवस साजरा केला होता. त्याचवेळी त्याने बॅटचा लिलाव (Bat Auction) करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याची माहिती २० एप्रिलला समोर आली. याबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, “हा माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे मी आणि गलीने चांगले आणि खास काही तरी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
राहुल पुढे म्हणाला की, “मी माझे क्रिकेट पॅड्स, ग्लोव्ह्ज, हेल्मेट आणि माझी जर्सी भारतीय सेनेच्या भागीदारीने देण्याचा निर्णय घेतला आहे. ते लोक या सर्व वस्तूंचा लिलाव करणार आहेत. तसेच यातून मिळणारा निधी अवेअर फाऊंडेशनमध्ये (Aware Foundation) जाईल. हे फाऊंडेशन मुलांची मदतीसाठी काम करते. हे माझ्यासाठी खूप खास आहे. यापेक्षा चांगला दिवस मी निवडू शकत नाही.”
राहुल यापूर्वीही अनेक वेळा लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. यापूर्वी त्याने समाजसेवी संस्था ‘फूल वर्षा’च्या मदतीची घोषणा केली आहे. ही संस्था लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान गरीब आणि गरजू लोकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देत आहे. इतकेच नव्हे तर त्याने ‘स्टे हॅप्पी’ नावाच्या संस्थेचीही मदत केली होती. जे बेंगळुरुमधील भटक्या प्राण्यांची मदत करतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-युवराज म्हणतो, आयपीएल लिलावावेळी या कारणाने येते टेन्शन
-आणि थेट शिला की जवानी गाण्यावर ऑस्ट्रेलियाच्या वाॅर्नरने व मुलीने धरला ठेका
-फक्त एक आणि एकच टी२० सामना खेळायला मिळालेले ५ भारतीय खेळाडू