---Advertisement---

वनडेमध्ये 5व्या क्रमांकावर राहुलची बॅटींग जबरदस्तच! आकडेवारी एकदा पाहाच

On: शुक्रवार, जानेवारी 13, 2023 10:39 AM
KL Rahul vs SL
---Advertisement---

भारत विरुद्ध श्रीलंका (INDvSL) यांच्यात गुरूवारी (12 जानेवारी) दुसरा वनडे सामना खेळला गेला. हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. या विजयामध्ये सर्वात मोठा वाटा भारताचा विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल (KL Rahul)याचा राहिला. त्याने श्रीलंकेविरुद्ध पाचव्या क्रमांकावर येत संथ गतीने फलंदाजी करत कमाल केली. तसेच या क्रमांकावर त्याची आकडेवारीही जबरदस्त आहे.

कोलकातामध्ये झालेल्या या वनडेत भारताला विजयासाठी 216 धावसंख्येचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात भारताने 86 धावांवरच 4 विकेट्स गमावल्या. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या राहुलने मोर्चा सांभाळत संघाला विजय मिळवून दिला. त्याने 103 चेंडूत 64 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 62.13 असा राहिला. त्या या संथ पण महत्वाच्या खेळीत 6 चौकार मारले.

खूप काळानंतर राहुलच्या बॅटमधून चांगली खेळी बाहेर पडली. त्याने एकप्रकारे टिकाकरांना चोख उत्तर दिले आहे. टी20मध्ये सलामीला फलंदाजी करणाऱ्या या 30 वर्षीय खेळाडूची पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजीची आकडेवारी विक्रमी आहे. या क्रमांकावर त्याने 15 वनडे सामन्यात फलंदाजी करताना 54.25च्या सरासरीने 651 धावा केल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक काळ टीकूच दिले नाही. त्यांच्याकडून सर्वाधिक धावा नूवानिदू फर्नांडो याने केल्या. त्याने पदार्पणाच्या या सामन्यात 63 चेंडूत 50 धावा केल्या. त्यानंतर एकही फलंदाजी 40च्या पुढे गेला नाही. यामुळे श्रीलंकेने 39.4 षटकात सर्व विकेट्स गमावत 215 धावा केल्या. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.

भारताने 216 धावांचे लक्ष्य 43.2 षटकात गाठले. या मालिकेतील पहिला सामना भारताने 67 धावांनी जिंकला आहे. यामुळे यजमानांनी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. कुलदीपने चरिथ असालंका, दसुन शनाका आणि कुशल मेंडिस यांना बाद केले आणि तो सामनावीर ठरला. या मालिकेतील तिसरा सामना 15 जानेवारीला तिरुअनंतपुरममध्ये खेळला जाणार आहे.
(KL Rahul batting at number 5 in ODI is amazing Just look at stats, INDvSL 2nd ODI)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर, महत्वाच्या खेळाडूंना वगळले
ईस्ट बंगालला अजूनही प्ले ऑफची आशा; जमशेदपूरविरुद्ध 3 गुण मिळवण्याचा निर्धार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---