भारताचा यष्टीरक्षक फलंदाज आणि सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) हा गेल्या काही महिन्यांपासून जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने नुकत्याच मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दमदार फलंदाजी कामगिरी केली होती. याच बळावर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी दिली गेली आहे. याच संधीचे नाणे खणखणीत वाजवत त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच कसोटी सामन्यात शानदार शतकी खेळी (Test Century In South Africa) केली आहे. यासह त्याने बरेचसे विक्रमही आपल्या नावावर केल्या आहेत.
सेंच्यूरियन येथे सुरू असलेल्या या बॉक्सिंग डे कसोटीत पाहुण्या भारताने प्रथम फलंदाजी करताना ३२७ धावा केल्या आहेत. भारताची धावसंख्या ३०० पार नेण्यात राहुलचा मोठा वाटा राहिला आहे. त्याने सलामीला फलंदाजीला येत २६० चेंडूंचा सामना करताना १२३ धावा चोपल्या. १ षटकार आणि १६ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या आहेत. यासह तो दक्षिण आफ्रिकेत सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. (Highest Test Score In South Africa)
याबाबतीत राहुलने भारताचे दिग्गज फलंदाज वसिम गाफर (Wasim Jaffer) आणि मुरली विजय (Murali Vijay) यांना मागे टाकले आहे. यापूर्वी जाफर हे ११६ धावांच्या सर्वोच्च वैयक्तिक धावांसह या विक्रमांत अव्वलस्थानी होते. परंतु आता ते दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. तर मुरली विजय ९७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विशेष म्हणजे, कसोटी क्रिकेटमध्ये राहुलची बॅट २०२१ मध्ये खूप तळपली आहे. त्याने यावर्षी फक्त ५ कसोटी सामने खेळताना भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० फलंदाजांमध्ये जागा मिळवली आहे. तो ४३८ धावांसह सातव्या क्रमांकावर आहे. तर त्याच्या एकंदर कसोटी क्रिकेटमधील कामगिरीविषयी बोलायचं झाल्यास, त्याने ४० कसोटी सामने खेळताना ६८ डावात फलंदाजी करत २३२१ धावा केल्या आहेत.
दरम्यान बॉक्सिंग डे कसोटीविषयी बोलायचे झाल्यास, राहुलला वगळता भारताच्या एकाही फलंदाजाला ७० धावांपर्यंत मजल मारता आलेली नाही. केवळ भारताचे सलामीवीर राहुल आणि मयंक अगरवाल अर्धशतकी धावा करू शकले. मयंकने या सामन्यात ६० धावांची खेळी केली होती. तसेच अजिंक्य रहाणेने ४८ धावा जोडल्या. यामुळे भारत दक्षिण आफ्रिकेला ३२८ धावांचे लक्ष्य देऊ शकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ कारणाने लांबलीये वनडे संघाची संघनिवड; महत्त्वाची माहिती आली समोर
शिखर-कर्तिकची मस्ती ते जार्वोचा मैदानात प्रवेश; २०२१ मधील क्रिकेटच्या मैदानावरील टॉप ५ बेस्ट मुमेंट
हेही पाहा-