जोहान्सबर्गच्या (Johannesburg) मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) अनुपस्थितीत भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी केएल राहुलला देण्यात आली आहे. त्याने कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात तुफानी खेळी करत अर्धशतक झळकावले आहे. यासह त्याच्या नावे एक मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात त्याने अर्धशतकी खेळी केली. त्याने १३३ चेंडूंचा सामना करत ९ चौकारांच्या साहाय्याने ५० धावांची खेळी केली. यासह तो कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध अर्धशतक झळकावणारा पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. (First indian captain to score test half century in South Africa on debut test). तसेच भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारा तो ८ वा कर्णधार ठरला आहे.
भारतीय संघाकडून कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम विजय हजारेंच्या नावावर आहे. त्यांनी १९५१-५२ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १६४ धावांची खेळी केली होती. तर या यादीत दुसऱ्या स्थानी सुनील गावस्कर आहेत. त्यांनी १९७५-७६ मध्ये न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ११६ धावांची खेळी केली होती. तर विराट कोहलीने २०१४-१५ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात ११५ धावांची खेळी केली होती. या बाबतीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
भारतीय कर्णधार म्हणून पदार्पणाच्या सामन्यात सर्वात मोठी खेळी करणारे भारतीय कर्णधार
१६४* धावा – विजय हजारे विरुद्ध इंग्लंड – १९५१-५२
११६ धावा – सुनील गावस्कर विरुद्ध न्यूझीलंड १९७५-७६
११५ धावा – विराट कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया – २०१५-१६
८४ धावा – सौरव गांगुली विरुद्ध बांगलादेश – २०००-२००१
६९ धावा – चंदू बोर्डे विरुद्ध ऑस्ट्रेलिया – १९६७/६८
६३ धावा – एच ऑफिसर विरुद्ध वेस्ट इंडीज – १९५८-१९५९
६२ धावा – नारी कॉन्ट्रॅक्टर विरुद्ध पाकिस्तान – १९६०-६१
५० धावा – केएल राहुल विरुद्ध दक्षिण आफ्रिका – २०२१/२२*
महत्वाच्या बातम्या :
साॅरी..साॅरी..! पहिल्याच सामन्यात मैदानावर कर्णधार राहुलला मागावी लागली माफी, पण का? पाहा व्हिडिओ
विराट-रहाणे आणि पुजाराला भारी पडला एकटा रूट! पाहा ही ‘अविश्वनिय’ आकडेवारी
हे नक्की पाहा : क्रिकेटमधील डक अन् त्याचे प्रकार