दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला रविवार (२६ डिसेंबर) पासून प्रारंभ झाला आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी पूर्णपणे भारतीय संघाचा बोलबाला राहिला आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या केएल राहुल याने(KL Rahul) मोठा विक्रम करत दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
केएल राहुलने सामन्याच्या पहिल्याच दिवशी तुफानी खेळी केली. यासह तो १२२ धावा करत नाबाद आहे. तसेच त्याने मयांक अगरवाल सोबत मिळून डावाची सुरुवात करताना महत्वपूर्ण शतकी भागीदारी देखील केली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत डावाची सुरुवात करताना शतक झळकावणारा तो दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा केवळ वसीम जाफर यांना करता आला आहे. वसीम जाफर(Wasim jaffer) यांनी २००७ साली सलामीला ११६ धावांची खेळी केली होती.
सेंच्युरियनमध्ये असा कारनामा करणारा केवळ तिसराच फलंदाज
केएल राहुलने सेंच्युरियनच्या( Centurian) मैदानावर शतक झळकावताच दिग्गज फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला आहे. तो सेंच्युरियनच्या मैदानावर शतक झळकावणारा केवळ तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा सचिन तेंडुलकर( Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांनाच करता आला आहे.
साल २०१० मध्ये भारतीय संघाने ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकरने सेंच्युरियनच्या मैदानावर १११ धावांची खेळी केली होती, तर २०१८ मध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीने सेंच्युरियनच्या मैदानावर १५३ धावांची खेळी केली होती. आता केएल राहुलचा देखील या यादीत समावेश झाला आहे.
तसेच दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा केएल राहुल केवळ १० वा भारतीय फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, राहुल द्रविड, कपिल देव, वसीम जाफर, मोहम्मद अझहरुद्दीन, वीरेंद्र सेहवाग आणि प्रवीण अमरे यांनी हा पराक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक खेळी करण्याचा पराक्रम सचिन तेंडुलकरने केला आहे. त्याने १६९ धावांची खेळी केली होती.
महत्वाच्या बातम्या :
दक्षिण आफ्रिका गाजवणाऱ्या ‘टॉप ३’ जोड्यांमध्ये सामील झाले मयंक-राहुल
दर्जा कामगिरी! प्रत्येक देशातील मैदानांवर राहुलने उमटविला ‘शतकी’ ठसा
हे नक्की पाहा: त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट