---Advertisement---

रोहित, रैना, विराटलाही इतक्या वर्षात जे जमलं नाही ते केएल राहुलने करुन दाखवले

On: सोमवार, ऑक्टोबर 19, 2020 12:59 PM
---Advertisement---

रविवारी(१८ ऑक्टोबर) आयपीएलमध्ये ३६ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात दुबईमध्ये झाला. रंगतदार झालेल्या या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाबने २ सुपर ओव्हरनंतर मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला. या सामन्यादरम्यान पंजाबचा कर्णधार केएल राहुलने एक खास विक्रम केला आहे.

त्याने या सामन्यात ५१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याने यंदाच्या आयपीएल हंगामात ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने आत्तापर्यंत ९ सामन्यात ५२५ धावा केल्या आहेत. राहुलने सलग तिसऱ्या आयपीएल हंगामात ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे आयपीएलच्या सलग ३ किंवा त्यापेक्षा अधिक हंगामात ५०० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. तर एकूण तिसरा खेळाडू आहे.

त्याच्याआधी ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर या परदेशी खेळाडूंनी हा पराक्रम केला आहे. वॉर्नरने २०१४, २०१५, २०१६ आणि २०१७ या सलग चार हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर गेलने २०११, २०१२ आणि २०१३ या सलग ३ हंगामात ५०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

सर्वाधिक अर्धशतके करणाराही खेळाडू 

केएल राहुलने आयपीएल २०२० मध्ये आत्तापर्यंत ५ अर्धशतके केली आहेत. त्यामुळे तो यंदाच्या हंगामात ५ अर्धशतके करणारा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्यापाठोपाठ या यादीत चेन्नई सुपर किंग्सचा फाफ डू प्लेसिस, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा एबी डिविलियर्स आणि मुंबई इंडियन्सचा क्विंटन डी कॉक आहे. या तिघांनीही या हंगामात ४ अर्धशतके केली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

सुपर ओव्हर पे सुपर ओव्हर! एकाच दिवसात ३ सुपर ओव्हर झाल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पडला पाऊस

ड्रामा डबल सुपर ओव्हरचा! मुंबईला धूळ चारत पंजाबने फडकावली विजयी पताका

आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशीचे दोन्ही सामने सुपर ओव्हरमध्ये निकालात….

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---