लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध एक आश्चर्यकारक झेल घेतला. राहुलनं चेंडू हातातून सुटल्यानंतरही झेल पूर्ण केला, ज्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होतं आहे. त्याच्या या कॅचमुळे दिल्लीची महत्त्वाची भागीदारी मोडल्या गेली.
दिल्लीच्या डावातील 9वं षटक टाकण्यासाठी फिरकीपटू रवी बिश्नोई आला होता. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शाई होपनं कव्हरच्या दिशेनं शॉट खेळला. चेंडू खूप जोरात जात होता. राहुलनं दोन हातांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात त्याच्या हातून चेंडू सुटला. मात्र दुसऱ्या प्रयत्नात त्यानं डाव्या बाजूला अप्रतिम डाईव्ह मारून झेल पूर्ण केला.
Taken on the second attempt 😎
Partnership broken thanks to a Klassy catch 💪
Watch the match LIVE on @JioCinema and @StarSportsIndia 💻📱#TATAIPL | #DCvLSG | @klrahul | @LucknowIPL pic.twitter.com/0EVa392SKT
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2024
शाई होपनं 27 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 38 धावांची खेळी केली. त्यानं अभिषेक पोरेलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी केली होती. केएल राहुलच्या या शानदार झेलनंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोएंका यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी टाळ्या वाजवून कर्णधाराराचं कौतुक केलं.
8 मे रोजी लखनऊला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या सामन्यानंतर गोयंका मैदानात राहुलवर रागावताना दिसले होते, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तेव्हापासून राहुल आणि गोयंका यांच्यात मतभेदाची चर्चा होती. मात्र, गोयंका यांनी दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी राहुलला त्यांच्या घरी जेवायला बोलावून सर्व काही ठीक असल्याचे संकेत दिले. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केल्याचे आणि मिठी मारल्याचे फोटोही समोर आले आहेत.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट गमावून 208 धावा केल्या. सामन्यात दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा जेक फ्रेझर-मॅकगर्क पहिल्याच षटकात खातं न उघडता बाद झाला. यानंतर सलामीवीर पोरेलनं होपसह डाव सांभाळला.
पोरेलनं 33 चेंडूत 58 धावा केल्या. त्यानं 5 चौकार आणि 4 षटकार लगावले. मागील सामन्यात निलंबनामुळे बाहेर बसलेल्या कर्णधार रिषभ पंतनं 23 चेंडूत पाच चौकारांसह 33 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्सनं झंझावाती अर्धशतक झळकावलं. त्यानं 25 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं नाबाद 57 धावा केल्या. लखनऊकडून नवीन उल हकनं 2 विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
काय सांगता! सीएसकेचा हा दिग्गज प्रशिक्षक बनू शकतो राहुल द्रविडनंतर टीम इंडियाचा नवा हेड कोच
आयपीएल 2024 च्या प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, तिकीट कसं खरेदी करायचं जाणून घ्या
“एबी डिव्हिलियर्सनं आयपीएलमध्ये असं काय केलंय?”, गौतम गंभीर बरसला; जाणून घ्या काय आहे प्रकरण