---Advertisement---

रिषभ पंतबरोबर होत असलेल्या तुलनेबाबत केएल राहुलने सोडले मौन; दिले ‘असे’ सडेतोड उत्तर

On: शुक्रवार, मार्च 26, 2021 6:17 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी फलंदाजीच नव्हे तर उत्कृष्ट यष्टीरक्षण देखील केले आहे. भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात केएल राहुलला यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर रिषभ पंत आणि केएल राहुल यांच्यात यष्टीरक्षणावरून तुलना केली जाऊ लागली होती. या चर्चांना पूर्णविराम देत केएल राहुलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पहिल्या वनडे सामन्यात कर्णधार विराट कोहलीने यष्टीरक्षक फलंदाज म्हणून केएल राहुलला संधी दिली होती. या सामन्यात राहुलने आक्रमक अर्धशतकी खेळी केली होती. तसेच उत्कृष्ट यष्टीरक्षण देखील केले होते. यांनतर रिषभ पंत आणि केएल राहुलची तुलना होऊ लागली होती.

यावर राहुलने प्रतिक्रीया देत म्हटले की, “भारतीय संघाचे हे वैशिष्ट्य आहे की, तुम्हाला आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागते. इतकेच नव्हे तर दररोज आपल्याला खेळाडू म्हणून आणखी सुधारणे करणे आवश्यक असते. जेव्हा तुम्ही भारतीय संघाचा भाग असता, तेव्हा तुम्हाला माहीत असते की, इथे खूप स्पर्धा असते. तुम्ही इथे निवांत बसून आपल्या जागेबद्दलचा आत्मविश्वास बाळगू शकत नाही.”

तसेच तो पुढे म्हणाला, “पहिल्या वनडे सामन्यात मी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पाचव्या क्रमांकावर मला क्रिजवर आणखी थोडा वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. मी काही चांगले शॉट खेळले होते. तसेच मला फूटवर्कमध्येही फरक जाणवला होता. आता मला अधिक आत्मविश्वास वाढू लागला आहे. ”

दुसऱ्या सामन्यासाठी रिषभ, राहुल संघात

तसेच दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्यामुळे रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे रिषभ पंत आणि केएल राहुल हे दोघेही अंतिम ११ जणांच्या संघात आहेत. तसेच रिषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे.

विशेष म्हणजे दुसऱ्या सामन्यात पंत आणि राहुलमध्ये ८० चेंडूत ११३ धावांची भागीदारीही झाली. ज्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करताना ३३६ धावांचा डोंगर उभारता आला आणि इंग्लंडला ३३७ धावांचे आव्हान देता आले. राहुलने १०८ धावांची खेळी केली. तर पंतने ७७ धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या –

तीच धावसंख्या तोच फलंदाज! आजवर एक-दोन नव्हे ‘इतक्यांदा’ विराट वनडेत झालाय ६६ धावांवर बाद

राहुलने कोहलीला टाकले मागे, ठरला ‘अशी’ कामगिरी करणारा सर्वात वेगवान भारतीय फलंदाज

ना विराट ना रोहित; कोणत्याही सक्रिय भारतीय फलंदाजाला न जमलेला विक्रम राहुलच्या नावावर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---