मुंबई । आयपीएल 2020 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार असून त्याचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाईल. यावेळी खेळाडू प्रेक्षकविना मैदानावर दिसून येतील. तसेच बर्याच नियमांमध्ये बदल झालेला दिसेल. यात काही शंका नाही की, क्रिकेटर्स प्रेक्षकांच्या उपस्थितीला खेळाडू नक्कीच ‘मिस’ करतील. कारण ते प्रेक्षक आहेत जे खेळाच्या दरम्यान खेळाडूंचा उत्तम प्रकारे उत्साह वाढविण्याचा प्रयत्न करतात. पण यावेळी असे होणार नाही, तरीही खेळाडूंनाही त्यांच्या संघांसाठी चांगले काम करावे लागेल. कारण हा प्रश्न विजेतेपदाचा आहे.
आयपीएलच्या 13व्या हंगामात प्रत्येक संघात एकापेक्षा एक दर्जेदार फलंदाज आहेत. जे सर्वोत्तम कामगिरी करण्यास तयार आहेत, पण जेव्हा या लीगमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च सरासरीने धावा करणार्या फलंदाजाचा विचार केला जातो तेव्हा, एमएस धोनी, विराट कोहली, ख्रिस गेल, डेव्हिड वॉर्नर या फलंदाजांची नावे मनात येतात. परंतू यात किंग्ज इलेव्हन पंबाजचे नेतृत्व करणारा फलंदाज केएल राहुल हा सर्वात पुढे आहे. या लीगमध्ये आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरीने राखणारा तो एकमेव फलंदाज केएल राहुल आहे.
आयपीएलच्या मागील 12 हंगामात धावांचा पाठलाग करताना राहुल सर्वाधिक सरासरीने धावा करणारा फलंदाज होता. 57.35 अशी त्याची सरासरी होती. दुसर्या स्थानावर डेव्हिड मिलर असून त्याची सरासरी 46.77 होती. तर तिसर्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर होता. त्याची सरासरी 43.16 आहे. या यादीत एमएस धोनी 7 व्या स्थानावर होता आणि त्याची सरासरी 39.43 आहे तर विराट कोहली 37.40 च्या सरासरीने 10 व्या स्थानावर होता.
आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक सरासरीने धावा करणारे टॉप फलंदाज (कमीत कमी ५०० धावा)
केएल राहुल – 57.35
डेविड मिलर – 46.77
डेविड वार्नर – 43.16
शॉन मार्श – 42.40
जोस बटलर – 40.45
केविन पीटरसन – 40.00
एमएस धोनी- 39.43
केन विलियमसन – 38.85
क्रिस गेल – 37.84
विराट कोहली – 37.40
रिषभ पंत – 37.16
सचिन तेंदुलकर – 36.57