---Advertisement---

केएल राहूल बॅक इन फॉर्म!! रवींद्र जडेजाच्या चेंडूवर लगावला गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल

On: रविवार, जून 13, 2021 9:01 PM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेटपटू मैदानात घाम गळताना दिसून येत आहेत. अशातच केएल राहुलने मारलेल्या एका शॉटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भारतीय संघाचा सराव सत्र सुरू असताना, संघातील आक्रमक फलंदाज केएल राहुल हा विस्फोटक फलंदाजी करताना दिसून येत आहे. रवींद्र जडेजाने टाकलेल्या चेंडूवर त्याने पुढे येऊन गगनचुंबी षटकार खेचल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.

केएल राहुल इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत देखील चांगल्याच फॉर्म मध्ये असल्याचे दिसून आला होता. हाच फॉर्म त्याने इंग्लंड दौऱ्यावर ही सुरू ठेवला आहे. तसेच रिषभ पंत देखील चांगल्याच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे. रिषभनेने गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराट कोहली, रिषभ आणि केएल राहुल यांपैकी कोणाला प्लेइंग ११ मध्ये स्थान देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा

राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसीकडून विनू मंकड यांना मोठा सन्मान; ५ युगांतील १० दिग्गजांचा ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश

रॉस टेलर ३७व्या वर्षीही पाडतोय धावांचा पाऊस, ‘या’ विक्रमात टाकले कोहलीला मागे

कसोटी अजिंक्यपद फायनलमध्ये कोहली निभावणार कामचलाऊ गोलंदाजाची भूमिका? ‘या’ व्हिडिओतून मिळाले संकेत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---