---Advertisement---

एशिया कप २०२२मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवायला तयार आहे केएल राहुल

On: मंगळवार, ऑगस्ट 23, 2022 1:33 PM
KL-Rahul
---Advertisement---

मुंबई: सध्या सगळ्या क्रिकेटवेड्यांच्या नजरा खिळल्या आहेत, त्या एशिया कप 2022 वर. संयुक्त अरब अमीरातीत (UAE) या महिन्याच्या 27 तारखेपासून मेगा टूर्नामेंटची सुरवात होणार आहे. टीम इंडियासुद्धा या सामन्यात जीवाची बाजी लावून खेळणार आहे. एकीकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी सगळीकडे रोहित शर्माचे नाव चर्चेत आहे. दुसरीकडे क्रिकेटजगतातील खेळाडू केएल राहुलच्या वापसीने सर्वांचाच जोश दुप्पट केलाय.

स्वदेशी माइक्रो-ब्लॉगिंग प्लेटफार्म, कू अॅपच्या माध्यमातून स्टार स्पोर्ट्सने एक पोस्ट शेयर केली आहे. यात सांगितले गेले आहे, की राहुल आपला जोश दाखवण्यासाठी पूर्णत: तयार आहे. एशिया कप 2022 साठी टीम इंडियाचा माजी कप्तान विराट कोहली आणि उप-कर्णधार केएल राहुलचे पुनरागमन झाले. टीम इंडिया एशिया कपमध्ये 28 ऑगस्टला पाकिस्तानच्याविरुद्धच्या सामन्याने सुरुवात करेल.

केएल राहुलला एशिया कप 2022 मध्ये टीम इंडियात पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत खेळीची सुरवात करण्यासाठी सर्वात मोठा दावेदार मानले जात आहे. केएल राहुलने दीर्घकाळानंतर टीम इंडियामध्ये उपस्थिती लावली आहे. साहजिकच आता चाहत्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ओपनिंग रोहित शर्मा आणि केएल राहुल करतील. असे मानले जाते, की दोघांची ओपनिंग जोडी खूप हिट राहिलेली आहे. रोहित शर्मा यावेळी अतिशय फॉर्ममध्ये आहे. केएल राहुल दुखापतीनंतर करत असलेल्या पुनरागमनाबाबतही अनेक अंदाज लावले जात आहेत.

एशिया कप 2022 मध्ये सहा संघ भाग घेणार आहेत. यात श्रीलंका, माजी चॅम्पियन भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगानिस्तान आधीच टूर्नामेंटसाठी क्वालीफाय केले आहे. क्वालीफाइंग टूर्नामेंटनंतर सहाव्या आणि और अंतिम टीमचा निर्णय होईल. भारत आपली सुरवात 28 ऑगस्टला पाकिस्तानच्या विरुद्ध सामना खेळून करणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---