---Advertisement---

केएल राहुलच्या ‘त्या’ कृतीतून दिसले देशप्रेम, चाहत्यांनी केले कौतुक, पाहा व्हिडिओ

On: गुरूवार, जुलै 22, 2021 3:44 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या नेतृत्वातील वरिष्ठ भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये ४ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू होईल. तत्पूर्वी भारतीय संघ येथे काउंटी एकादश संघाविरुद्ध तीनदिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्यात भारताचा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळत असलेल्या केएल राहुलने एका कृतीने आपल्यातील देशप्रेमाची व खेळाप्रतीची भावना दाखवून दिली. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सराव सामन्यात दिसले राहुलचे देशप्रेम
कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ डरहॅम येथे रिव्हर साईड मैदानावर पहिला तीनदिवसीय सराव सामना खेळत आहे. या सामन्यात पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांनी शानदार कामगिरी करत ३०० धावांची मजल मारली होती. नियमित कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी दुखापतीमुळे या सामन्यातून विश्रांती घेण्‍याचा निर्णय घेतला आहे. या कारणाने भारताचे कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळतोय.

रिषभ पंत व वृद्धिमान साहा यांच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडत असलेल्या फलंदाज केएल राहुलने १५० चेंडूत १०१ धावांची खेळी करत संघाच्या फलंदाजीचे नेतृत्व केले.

आपल्या शानदार फलंदाजीसह राहुलने मैदानावर चाहत्यांची मने जिंकणारी एक कृती केली. फलंदाजी दरम्यान राहुल आपले ग्लोव्हज व्यवस्थित करत होता. त्यावेळी त्याची ‘टेस्ट कॅप’ अचानकपणे हातातून खाली पडली‌. त्याने क्षणाचाही विलंब न लावता ती कॅप उचलून तिचे चुंबन घेतले. त्याच्या या कृतीचे चाहत्यांनी कौतुक केले. या कृतीवरून राहुलचे देशप्रेम व खेळाबद्दलची प्रामाणिकता दिसत असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/Dream11Insider/status/1417776901863608320?s=19

पहिल्या सामन्यात मिळू शकते संधी
भारताच्या वनडे संघाचा नियमित सदस्य असलेला राहुल आपला अखेरचा कसोटी सामना ऑगस्ट २०१९ मध्ये खेळला होता. इंग्लंड दौऱ्यावर त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. भारताचा नियमित सलामीवीर शुबमन गिल दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला असून, मयंक अगरवालने सराव सामन्यात केवळ २१ धावा बनविल्या होत्या. त्यामुळे, पहिल्या सामन्यात रोहित शर्मासह राहुलला सलामीवीर म्हणून पसंती देण्यात येऊ शकते.

महत्त्वाच्या बातम्या – 

हार्टब्रेक! शुबमन गिल परतला भारतात; इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून दुर्दैवीरीत्या व्हावे लागले बाहेर, पाहा फोटो

आणखी काय हवं! सराव सामन्यात शतक झळकावताच ‘त्याची’ इंग्लंड संघात झाली निवड; ५ वर्षांनंतर पुनरागमनाची संधी

Video: थ्री इडियट्स सिनेमात कुणी काम केलंय; भारतीय क्रिकेटपटूंची उत्तरं ऐकून तुम्हीही म्हणालं, ‘भावांनो आता बास!’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---