गुरुवारी (७ ऑक्टोबर) पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. चेन्नई सुपर किंग्स संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. तर पंजाब किंग्स संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी १२ षटकात दिलेले आव्हान पूर्ण करायचे होते. त्यामुळे कर्णधार केएल राहुलने चौफेर फटकेबाजी करत नाबाद ९८ धावांची खेळी केली आणि हा सामना १३ व्या षटकात आपल्या नावावर केला.
विजयानंतरही पंजाब किंग्स संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला असला तरी देखील केएल राहुलच्या खेळीने मात्र सर्वांचे मन जिंकले. या खेळीदरम्यान त्याने ड्वेन ब्रावोच्या चेंडूवर एक अप्रतिम षटकार मारला होता, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना, केएल राहुलचे रौद्ररूप पाहायला मिळाले होते. पंजाब किंग्स संघाला प्लेऑफच्या शर्यतीत टिकवून ठेवण्यासाठी त्याने शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न केले. परंतु इतर कुठल्याही फलंदाजाकडून साथ न मिळाल्याने पंजाब किंग्स संघ विजय मिळवून सुद्धा प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे.
केएल राहुलने या डावात ४२ चेंडुंमध्ये ७ चौकार आणि ८ षटकारांचा साहाय्याने नाबाद ९८ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने ब्रावोच्या गोलंदाजीवर एक क्लासिक षटकार मारला होता. १२ वे षटक टाकण्यासाठी ब्रावो गोलंदाजीला आला होता. राऊंड द विकेटचा मारा करत असलेल्या ब्रावोने राहुलला यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू फूल टॉस पडला, ज्यावर केएल राहुलने डीप फाईन लेगच्या दिशेने लॅप शॉट मारला. हा षटकार मारल्यानंतर ब्रावोचे हावभाव पाहण्यासारखे होते.
— No caption needed (@jabjabavas) October 7, 2021
चेन्नई सुपर किंग्स संघाकडून फाफ डू प्लेसिसची ७६ धावांची खेळी वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेaळी करता आली नाही. परिणामी चेन्नई सुपर किंग्स संघाला २० षटक अखेर ६ बाद १३४ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना केएल राहुलच्या ९८ धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाब किंग्स संघाने १३ षटकात हे आव्हान पूर्ण केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करत २०० धावा केल्या तर काय असेल प्ले-ऑफचे समीकरण?
चेन्नईच्या गोलंदाजांची दमछाक करत केएल राहुल बनला पंजाबची नवी ‘रनमशीन’, केला भीमपराक्रम
आख्ख्या सीएसकेला एकटा राहुल पुरुन उरला, नाबाद ९८ धावा चोपत ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय बनला