---Advertisement---

केएल राहुलचं मैदानात जोरदार पुनरागमन, दिल्ली कॅपिटल्सकडून या संघाविरुद्ध खेळणार पहिला सामना

On: शनिवार, मार्च 29, 2025 5:43 PM
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्स संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज के एल राहुल आता बाबा झाल्यानंतर कॅम्प सोडून त्याच्या घरी परत गेला होता. त्याची पत्नी अथिया शेट्टीने एका मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळेच राहुल दिल्ली संघासोबत पहिला सामना खेळू शकला नाही, पण आता तो कॅम्पमध्ये परत आला आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा पहिला सामना 24 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने एका विकेटने लखनऊचा पराभव केला. याच दिवशी केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीच्या जन्माची माहिती चाहत्यांना दिली. दिल्ली कॅपिटल्स संघाचा पुढचा सामना रविवार 30 मार्च रोजी होणार आहे.

रविवारी दोन सामने होणार आहेत. त्यातील पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद खेळला जाणार आहे. हा सामना विशाखापटनममध्ये दुपारी 3.30 वाजता खेळला जाईल. के एल राहुल हा सामना खेळण्यासाठी तयार आहे. फ्रेंचाईजीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

2013 पासून आयपीएलमध्ये खेळत असलेल्या के एल राहुलने पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायंट्स संघाचे त्याने प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएल 2025 पूर्वी लखनऊ संघाने त्याला रिलीज केले. तसेच आयपीएलच्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला 14 करोड रुपयांना खरेदी केले.

त्यानंतर अशा चर्चा होत होत्या की, दिल्ली राहुलला कर्णधार बनवणार आहे, पण त्यासाठी राहुलने नकार दिला. दिल्लीचे नेतृत्व अक्षर पटेलकडे सोपवण्यात आले आहे. संघाचा उपकर्णधार फाफ डुप्लेसी आहे. ज्याने मागच्या हंगामात आरसीबीसाठी कर्णधार पद भूषवले होते.

लखनऊ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना गमावणारच होती, पण आशुतोष शर्माने 31 चेंडूत 66 धावांची विजयी पारी खेळल्यामुळे दिल्लीने एका विकेटने विजय मिळवला. आशुतोष शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील नव्हता. तो मुकेश शर्माच्या जागी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून खेळण्यासाठी आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---