---Advertisement---

‘माझ्यासोबत बसणार का?’, केएल राहुलची सिराजला मोठी ऑफर, डिलीट व्हायच्या आधी पाहून घ्या व्हिडिओ

On: शुक्रवार, मार्च 24, 2023 4:54 PM
Mohammed-Siraj-And-KL-Rahul
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू केएल राहुल आणि मोहम्मद सिराज नुकतेच मुंबई विमानतळाच्या पार्किंगमध्ये आमने-सामने आले. यादरम्यानचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दिसते की, विमानतळावरून बाहेर पडताना राहुल आणि सिराज त्यांच्या गाड्या शोधत आहेत. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी राहुलचे कौतुकही केले आहे.

झाले असे की, भारतीय फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याला त्याची गाडी शोधून त्यात बसण्यात जास्त अडचण आली नाही. मात्र, मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याला समजलेच नाही की, त्याची गाडी कुठे आहे. तो विचारू लागला की, त्याची गाडी कुठे आहे. यावेळी राहुलने आपल्या संघसहकाऱ्याला गाडी शोधताना पाहून हसत हसत विचारले की, लिफ्ट पाहिजे का? यावेळी राहुल असे म्हणताना दिसला की, “बैठेगा मेरे साथ?” म्हणजेच माझ्यासोबत गाडीत बसणार का? असा प्रश्न त्याने सिराजला केला.

https://www.instagram.com/reel/CqH380ajXA8/?utm_source=ig_embed&ig_rid=3b3c7681-05df-4ae2-b962-f40929a5e77e

आता हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर एकाने कमेंट करत लिहिले की, “राहुलचे सिराजला गाडीत बसण्यासाठी बोलावणे खूप आवडले.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सिराज आणि राहुलमधील बाँड आवडले.” आणखी एकाने कमेंट केली की, “राहुल हा खूपच शांतताप्रिय खेळाडू आहे.”

खरं तर, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज (KL Rahul And Mohammed Siraj) दोघेही नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा भाग होते. भारतीय संघासाठी ही मालिका खूपच निराशादायी ठरली. भारताला तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-2ने पराभूत व्हावे लागले. राहुलने वनडे क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन केले आणि पहिल्या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. राहुलच्या फॉर्मविषयी खूपच चर्चा रंगली होती आणि त्याला बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील खराब प्रदर्शनानंतर संघाबाहेर काढण्याचा मागणीही केली जात होती.

तसेच, सिराजचे प्रदर्शन त्याच्या क्षमतेनुसार चांगले राहिले. सिराजने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत 5 विकेट्स नावावर केल्या. सिराजने पहिल्या वनडेत चमकदार कामगिरी करत 3 विकेट्स घेतल्या होत्या.

आता राहुल आणि सिराज (Rahul And Siraj) दोघेही आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेत खेळताना दिसणार आहेत. राहुल लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. तसेच, सिराज रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. (kl rahul offers lift to mohammed siraj at mumbai airport see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेच्या गोटात खळबळ! आयपीएल 2022 गाजवलेला गोलंदाज दुखापतग्रस्त, होऊ शकतो संपूर्ण हंगामातून बाहेर
‘मी आयुष्यात 10 वेळा सर्जरी केली, आता बुमराहदेखील लवकरच…’, ब्रेट लीचे ‘बूम बूम’विषयी मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---