जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ लागोपाठ दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्देच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. पण संघाचा नियमित यष्टीरक्षक रिषभ पंत यावेली डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नसेल. अशात या अंतिम सामन्यात भारतीय यष्टीरक्षकाच्या भूमिकेसाठी केएल राहुल आणि केएस भरत यांच्यात स्पर्धा आहे. यावर भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी निवडकर्ते सबा करीम यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
नुकत्याच खेळल्या गेलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत केएस भरत (KS Bharat) याने भारतासाठी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटी मालिकेत केएल राहुल (KL Rahul) देखील फलंदाजाच्या रूपात खेळत होता. पण पहिल्या दोन सामन्यांतील सुमार खेळीनंतर राहुलला तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीमध्ये प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर बसवण्यात आले. आता भारत डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर राहुल आणि भरत यांच्यातील कोण यष्टीरक्षक म्हणून खेळणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. सबा करीम (Saba Karim) यांच्या मते राहुलला यष्टीरक्षक म्हणून संघात घेतले नाही, तरी फलंदाजाच्या रूपात संधी मिळाली पाहिजे.
माध्यमांसमोर बोलताना करीम म्हणाले की, “हा पूर्णपणे संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. अलिकडच्या काळात युवा खेळाडूंना सतत संधी मिळत आहेत. संघ व्यवस्थापनाकडून सतत संधी दिली जात असून युवा खेळाडूंच्या मनात आत्मविश्वास तयार कसण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे व्यवस्थापन खेळाडूंच्या प्रदर्शनावर जास्त चर्चा करत नाहीये. खेळाडूच्या दर्जा अधिक महत्वाचा मानला जात आहे. यामुळे या खेळाडूंमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास येत आहे.खेळाडूंना असे वाटत आहे की, एक खराब खेली त्यांची कारकीर्द खराब करू शकत नाही.”
“केएल राहुल यष्टीरक्षक म्हणून खेळला नाही, तरी फलंदाज म्हणून त्याची निवड संघात झाली पाहिजे. त्याच्याकडे खूप गुणवत्ता आहे. ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही,” असेही माजी निवडकर्ते पुढे म्हणाले. बॉर्डर गावसकर ट्रॉफीदरम्यान खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल असल्याने चेंडू मोठ्या प्रमाणात टर्न होत होता. अशात यष्टीरक्षक केएस भरतसाठीही यष्टीपाठी जबाबदारी पार पाडणे कठीणच होते. सबा करीम यांनीही हा मुद्दा लक्षात अणून दिला. ते म्हणाले, “मी आशा करतो की, केएस भरतला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळावी. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेदरम्यान खेळपट्टी सामान्य नव्हती. असात कोणत्याची यष्टीरक्षकासाठी त्याठिकाणी उभे राहणे कठीणच होते. अशा परिस्थितीमध्ये भारतीय गुणवत्ता तपासली जायला नको.”
(KL Rahul or KS Bharat, who will get a chance to play WTC final?)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीला पहिला विजय मिळवून देणारी कनिका आहे तरी कोण? वनडेत ठोकलय चक्क त्रिशतक
वेस्ट इंडीज क्रिकेटमध्ये मोठा बदल, इंग्लंडच्या पावलावर पाऊल टाकणार कॅरेबियन संघ