आयपीएल 2026 चा थरार आधीपासूनच वाढू लागला आहे, कारण बातमी अशी आहे की के.एल. राहुल पुढच्या हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडू शकतो. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांना राहुलला ट्रेड करून घ्यायची इच्छा आहे. विशेष म्हणजे, चेन्नई आणि कोलकाता दोघेही राहुलला कर्णधारपद देण्यास तयार आहेत. मात्र, यावर अंतिम निर्णय राहुल नव्हे, तर दिल्ली कॅपिटल्स घेणार आहे. राहुल सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 500 हून अधिक धावा केल्या आहेत.
आता हे पाहणे महत्त्वाचे ठरेल की हा फक्त कॅश डील असेल की दिल्ली कॅपिटल्स कोणत्या वरिष्ठ खेळाडूला चेन्नई किंवा कोलकाता सोबत ट्रेड करू शकते. चेन्नई सुपर किंग्ज केएल. राहुलला एमएस. धोनीच्या जागी संघात घेऊ शकते, कारण राहुल विकेटकीपिंगचं जबाबदारीही निभावू शकतो. आयपीएल 2025 संपल्यानंतर संजू सॅमसनच्या चेन्नई संघात जाण्याच्या चर्चांना जोर आला होता, पण नवीन अपडेटनुसार चेन्नई कुठेतरी राहुलला धोनीच्या पर्यायाच्या रूपात पाहत आहे.
जर चेन्नई सुपर किंग्ज केएल राहुलचा ट्रेड यशस्वी करू शकली, तर तो एमएस. धोनीसाठी परफेक्ट पर्याय ठरू शकतो. राहुल संयमाने खेळतो, नेतृत्व करू शकतो आणि यष्टीरक्षणाची जबाबदारीही आपल्या खांद्यावर घेऊ शकतो.
दुसऱ्या बाजूला, कोलकाता संघात विदेशी यष्टीरक्षक फलंदाज चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. रहमानुल्ला गुरबाज आणि क्विंटन डीकॉक यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवला. अशा परिस्थितीत केएल राहुलच्या आगमनाने केवळ एक अनुभवी यष्टीरक्षक फलंदाजच मिळणार नाही, तर तो कोलकाताच्या कर्णधारपदाची समस्या देखील सोडवू शकतो.
केएल राहुलला आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 14 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले होते. मागील हंगामात तो दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 13 सामन्यांत 539 धावा केल्या होत्या.






